राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण शोधाचा वेदांमध्ये उल्लेख असल्याचे वक्तव्य केले आहे (फोटो - सोशल मीडिया)
जयपूर : भारतीय संस्कृती आणि परंपरेला शतकोनुशकतांचा इतिहास आहे. भारतामधील प्रगत शिक्षण आणि शोध यांची ख्याती पसरली आहे. मात्र आता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे सध्या चर्चेमध्ये आले आहे. भारताच्या वेदांचे कौतुक करताना हरिभाऊ बागडे यांनी न्युटनच्या शोधावर प्रश्न उपस्थित केला आहे. जयपूरच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना हरिभाऊ बागडे यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम वेदांमध्ये असल्याचे सांगितले आहे. यामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
जयपूरच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामधील कार्यक्रमामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी भारताच्या वेदांचे कौतुक केले. बागडे म्हणाले की, “भारत हा पूर्वीपासून ज्ञान आणि विज्ञानमध्ये समृद्ध आहे. भारताने पूर्ण जगाला दशांश प्रणाली दिली. भारद्वाज ऋषींनी विमान तयार करण्यावर ग्रंथरचना केली. न्यूटनने जगाला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तर खूप उशीरा सांगितला. गुरूत्वाकर्षाचा नियमाचा उल्लेख तर फार पूर्वीपासून वैदिक ग्रंथात आढळतो.” असे हरिभाऊ बागडे म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हरिभाऊ बागडे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पुढे ते म्हणाले की, “अनेक शोधाची जननी भारत आहे. वीज असो वा विमान, याचा उल्लेख ऋग्वेदासहीत इतर अनेक ऐतिहासिक ग्रंथात मिळतो. भारद्वाज ऋषी यांनी विमान तयार करण्याविषयी एक पुस्तक सुद्धा लिहिली आहे. तर 50 वर्षांपूर्वी नासाने पत्र लिहून या पुस्तकाची भारताकडे मागणी केली होती. इंग्रजांनी भारतीय ज्ञान दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता वाढवणे आणि त्याला भारतीय ज्ञान आणि विज्ञानसोबत जोडणे महत्त्वपूर्ण आहे, असे हरिभाऊ बागडे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात जगभरातील विद्यार्थी शिकायला येत होते, असे बागडे नाना म्हणाले. तेव्हा संस्कृत ही भाषा होती. त्यावेळी इतर भाषा अध्ययनासाठी, अभ्यासासाठी नव्हत्या असे ते म्हणाले. नालंदा विद्यापीठ बख्तियार खिलजी याने जाळले होते. आता नालंदा विद्यापीठ नव्याने स्थापन करण्यात येत असल्याचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी विद्यार्थ्यांना खास सल्ला देखील दिला आहे. ते म्हणाले की, “अभ्यासासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या जीवनात होणाऱ्या नवीन बदलांशी संबंधित साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके ज्ञानासाठी पुरेशी नाहीत. व्यावहारिक ज्ञानातूनच बौद्धिक क्षमता विकसित होते आणि जीवनात प्रगती शक्य आहे. विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेशी संबंधित शिक्षणावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.