भय्याजी जोशींच्या मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांनी कुठेही...
मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषा हीच महत्त्वाची आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसांच्या मागे उभं राहण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. मराठीला अभिजात दर्जा दिला गेला, विरोधक जे काही राजकारण करत आहेत ते त्यांनी थांबवाव, भैय्याजी जोशी यांनी देखील त्याच्या वक्तव्याचं स्पष्टीकरणं दिलं आहे. त्यांनी मराठी भाषेचा कुठेही अपमान केलेला नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रमध्ये मराठी भाषा आणि मराठीलाच प्राधान्य आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी भाषेसाठी आपण सगळेजण सर्व काही करत आहोत. मराठी भाषेला आपण दर्जा मिळवून दिला आणि त्यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी देखील केली. त्यामुळे पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. आणि या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक लोकांना मराठी माणसांच्या मागे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे कोणी किती बोलत आहे मराठी भाषा आपली मायबोली आहे. त्यामुळे जे कोणी राजकारण करत आहेत त्या लोकांनी राजकारण थांबवाव.
#WATCH | Mumbai: On the statement of RSS leader Bhaiyyaji Joshi, Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde, “Bhaiyyaji Joshi has given clarification on what he said. I also say that Marathi is our first language in Maharashtra…He (Prime Minister Modi) has given Marathi… pic.twitter.com/ACAypYMjmf — ANI (@ANI) March 6, 2025
भय्याजी जोशी यांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेल आहे. याचा अर्थ त्यांनी मराठी भाषेचा कुठेही अपमान केलेला नाही. मराठी भाषा मला बोली आहे असं देखील त्यांनी सांगितलं. त्यांनी मराठी भाषेला आणि कुठेही दुय्यम समजलेलं नाही. त्यामुळे याच कोणी राजकारण करू नये. अनेक लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रचारावेळी बॅनर लावत होते, मराठी भाषा विसरले होते. मराठी भाषेला विरोध केला तर मराठी माणूस माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिली आहे.