Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; बड्या नेत्याच्या नावाची चर्चा

Maharashtra Politics: छगन भुजबळ हे ओबीसी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि ओबीसी राजकारण लक्षात घेता त्यांना राज्यसभेत पाठवणे पक्षासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 23, 2026 | 10:58 AM
Sunetra Pawar, Sunil Tatkare, NCP, Maharashtra Politics

Sunetra Pawar, Sunil Tatkare, NCP, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:

Rajya Sabha  Election 2026 :  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या रिक्त जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे जागा रिक्त

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर नवीन खासदार निवडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शुक्रवारी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.

Mumbai News: नायरमध्ये बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर! सीएसआर निधीतून सहाय्य; अत्याधुनिक व दर्जेदार सेवा मिळणार

निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे:

अधिसूचना जारी होणार: १ जून २०२६

मतदान प्रक्रिया: १८ जून २०२६

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यामुळे आता अजित पवार गटाकडून कोणाला संधी मिळते आणि ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला असून, छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये काम करण्याची इच्छा भुजबळ यांनी यापूर्वी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rajya Sabha election 2026 : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकांची घोषणा; १८ जून रोजी मतदान

 

मात्र, या संभाव्य उमेदवारीमुळे पक्ष नेतृत्वासमोर नवा पेच निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवायचे असल्यास त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारीसोबतच मंत्रिपदाच्या समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद आणि संघटनात्मक पदांवरून आधीच विविध स्तरांवर नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत भुजबळ यांची अट मान्य करायची की नवीन पर्याय शोधायचा, याबाबत पक्ष नेतृत्व सावध भूमिका घेत असल्याचे समजते.

Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव

दरम्यान, छगन भुजबळ हे ओबीसी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि ओबीसी राजकारण लक्षात घेता त्यांना राज्यसभेत पाठवणे पक्षासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र, त्याचवेळी पक्षातील इतर इच्छुक आणि मंत्रिपदाच्या अपेक्षांमुळे अजित पवार गटासमोर समतोल साधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

राज्य सभेच्या 24 जागांसाठी मतदान

निवडणूक आयोगाने जून-जुलैमध्ये रिक्त होणाऱ्या २४ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील दोन राज्यसभा जागांच्या पोटनिवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. १० राज्यांमधील २४ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जून-जुलैमध्ये संपत आहे. आयोगाने सर्व २४ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

 

 

 

Web Title: Rajya sabha bye election polling on june 18 for seat vacated by sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Maharashtra Politics
  • Rajya Sabha Elections 2026
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
1

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
2

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
3

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
4

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.