Rehan Vadra : मी त्यांच्या नियम व अटी वाचल्या होत्या; फोटो प्रदर्शनाबाबत रेहान वाड्राचे धक्कादायक विधान; सौजन्य : आयएएनएस
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्राच्या दिल्लीस्थित बिकानेर हाऊसमध्ये होणाऱ्या सोलो फोटो प्रदर्शनाबाबत एक मोठा वाद निर्माण झाला आहे. बिकानेर हाऊस व्यवस्थापनद्वारे 70 पेक्षा जास्त फोटो हटवण्यास सांगितल्यानंतर आता रेहान वाड्रा(Rehan Vadra) ची प्रतिक्रिया समोर येत आहे.
एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रेहान वाड्रा म्हणाला की, मी बिकानेर हाऊसच्या राजकीय बाबींशी निगडीत सर्व नियम व अटी वाचल्या होत्या. त्यानंतर मी माझे फोटो निवडले होते. तसंच माझ्या फोटो प्रदर्शनात राजकीय घोषणाबाजी किंवा नेत्यांचे फोटोही कमीच होते.
रेहान पुढे म्हणाला की, हे जे काही झालं आहे, मला वाटतं चुकीचं झाले आहे. हा माझ्यावरील अन्याय आहे. मी जितकं शक्य आहे, बिकानेर हाऊससोबत सहयोग केले. त्यांची जी राजकीय बाबींबाबतची अट होती, ते वाचूनच मी आपले फोटो निवडले. आम्ही कोणतीच राजकीय घोषणाबाजी प्रसिद्ध केली नाही. नेत्यांचे फोटोही जास्त नव्हते.
त्यांनी मला ते फोटो हटवायला सांगितले, तेव्हा मी त्यांना म्हणालो की, आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे करू. चार ते पाच फोटो तुम्हाला हटवायचे असेल, तर नक्की ते हटवा, पण मला त्याचे कारणही द्या. ते कारण आम्हाला मिळाले नाही. ते मला म्हणाले की, 70 च्या 70 फोटो तुम्हाला हटवावे लागतील.
शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष, दुष्काळी परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज : आमदार रोहित पवार
रेहान वाड्रा म्हणाला की, एका सार्वजनिक संस्थेच्या रुपात बिकानेर हाऊसची जबाबदारी आहे की, त्यांनी कलाकार आणि कलादालनांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कायम राखायला हवे. त्यांची रक्षा करायला हवी. मला वाटते की, याप्रकरणी असे काही झालं नाही.
तो पुढे म्हणाला की, मला सांगण्यात आले की, माझे फोटो हे संस्थेच्या नियमांविरोधात आहेत. माझे अनेक फोटो इन्स्टाग्रावरही उपस्थित आहेत व त्यात सर्वसाधारण लोकच पाहण्यास मिळतात. हो, हे फोटो आंदोलनाचा आहेत, पण त्यात सर्वसाधारण लोकच पाहण्यास मिळतील.
रेहान म्हणतो की, बिकानेर हाऊसने आपल्या नियमांना अधिक विस्ताराने बनवायला हवे. राजकीय सामग्री म्हणजे काय? व त्याचा निर्णय कोण करतो? हेही स्पष्ट करायला हवे. दुसरे म्हणजे, बहुतेक कलाकार हे राजकीय असतात, तेव्हा आपण असे नियम ठेवायलाच नकोत असे मला वाटते.
रेहानला विचारण्यात आले की, तुझ्या फोटोत तुझे मामा राहुल गांधी किंवा तुझी आई प्रियंका गांधी यांचे फोटो आहेत का? तर तो म्हणाला की, एक-दोन फोटोत हलकीशी झलक त्यांची पाहण्यास मिळते. मी सर्व बाजूने विचार करून हे फोटो निवडले आहेत, जेणेकरून त्यातून वाद होऊ नये.
तुला तुझी आई किंवा मामामुळे लक्ष्य करण्यात आले? असा प्रश्न केल्यावर रेहान म्हणतो की, मी त्यावर काही बोलू शकत नाही. याचं उत्तर बिकानेर हाऊसवालेच देऊ शकतात. तुझे फोटो हटवण्याबाबत तुझ्या आईची काय प्रतिक्रिया होती, असे विचारल्यावर तो म्हणाला की, हे कळल्यावर ती मला म्हणाली की, तुला जे योग्य वाटते ते तू कर.
Ans: दिल्लीतील बिकानेर हाऊस येथे आयोजित करण्यात येणाऱ्या रेहान वाड्रा यांच्या एकल फोटो प्रदर्शनातील ७० हून अधिक छायाचित्रे हटवण्यास सांगण्यात आल्याने वाद निर्माण झाला.
Ans: उत्तर: असल्याचे रेहान वाड्रा यांनी म्हटले.
Ans: रेहान यांच्या म्हणण्यानुसार, प्रदर्शनातील काही छायाचित्रे आंदोलनांशी संबंधित आहेत. मात्र, त्यात सर्वसामान्य लोक प्रामुख्याने दिसतात.






