Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा

रोहित पवार यांनी मोठे विधान करत अजित पवारांच्या अपघात प्रकरणात नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. यामुळे यप्रकरणावरून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 08:49 PM
MLA Rohit Pawar press on ashok kharat video include political leader marathi news

MLA Rohit Pawar press on ashok kharat video include political leader marathi news

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या अपघात प्रकरणात नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे कनेक्शन?
  • रोहित पवार यांचे अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत मोठे भाष्य
  • तपास सीबीआय कडे देण्याची रोहित पवारांची मागणी
दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. बारामतीमध्ये झालेल्या या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी याआधीच केला होता. अजित पवारांच्या अपघाताची (Ajit Pawar Plane Crash) पूर्ण सखोल चौकशी व्हावी यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) पूर्ण प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच आता रोहित पवार यांनी मोठे विधान करत अजित पवारांच्या अपघात प्रकरणात नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. यामुळे यप्रकरणावरून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.

काय म्हणाले रोहित पवार ?

रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत पोस्ट करत मोठे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी नवा खुलासा करत अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी भोंदू अशोक खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल झाले असल्याचे सांगितले आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर येत असून, ‘त्या’ सहा दिवसांत खरातने चार फोन बदलले, तर एक फोन केवळ १९ मिनिटांचा कॉल करून बदलला. खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.”

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर येत असून, ‘त्या’ सहा दिवसांत खरातने चार फोन बदलले, तर एक फोन केवळ १९ मिनिटांचा कॉल करून बदलला. खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय… pic.twitter.com/8PN8tsTRRS — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 19, 2026

ते पुढे म्हणाले, “अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून, या प्रकरणात CID कडे माहिती देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे तात्काळ CBI कडे हा तपास देणं गरजेचं आहे. सीबीआयकडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल, ही अपेक्षा आहे. सरकारने आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच, शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील.”

ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या गळाला? शिवसेनेच्या बड्या नेत्यांशी घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची निधनांनंतर आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे आधीपासूनच दिसत आहे. आतापर्यंत घेतलेल्या अनेक पत्रकार परिषदांमधून त्यांनी अनेक गंभीर आरोप तसेच नवनवीन खुलासे केल्याचे पाहायला मिळत आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचे अजित पवार यांच्या अपघाताशी संबंध असल्याचे आरोप त्यांनी याआधीही केले आहेत. त्यासाठी सीबीआय चौकशी मागणी त्यांनी केली असून अजित पवार यांचा घात कि अपघात याबाबतचा संशय त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे.

NCP Politics: राष्ट्रवादीत नव्या चाणक्याची एन्ट्री ? सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी घेतली गुप्त भेट

Web Title: Rohit pawar alledges connection of ashok kharat with ajit pawar plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Ashok Kharat Case
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र
1

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे
2

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा
3

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका
4

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.