आमदार रोहित पावर यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अजित पवारांचा अपघातापूर्वीचा घटनाक्रम सांगितला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार यांचा विमान प्रवास हा अचानक ठरवला गेला. जर 27 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पुण्याला कारने गेले असते तर पुण्याला पोहचले आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला गेले असते. तर मग ही दुर्दैवी घटना घडली नसती. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर मी अगोदर बोललो आहे. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुणाचा फोन आला हे लोकांना आता कळालं आहे,” असे म्हणत रोहित पवार यांनी प्रमोदराव हिंदूराव यांच्या वक्तव्याचा हवाला दिला आहे.
हे देखील वाचा : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर
पुढे ते म्हणाले की, “फाईलवर मुद्दामून स्वाक्षरी झाली पाहिजे अशी एका नेत्याने इच्छा व्यक्त केली. दादांनी ती स्वाक्षरी केली आणि संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचं विमानाने जाण्याचा प्लॅन झाला असता तर 26 तारखेला संध्याकाळी अथवा 27 तारखेलाच दुपारी विमानाचं बुकिंग झालं असतं. जी काही क्रमवारी ती मी बोलून दाखवली. मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. माझं प्रामाणिक मत आहे की या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, “27 तारेखापासून ते 28 तारखेपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे. तर जे प्रमुख पायलट होते. ते कुणाला भेटले. महिनाभर आणि दोन महिन्याभर कुणाच्या संपर्कात होते, कुणाला भेटले होते याची सु्द्धा चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
हे देखील वाचा : मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…
रोहित पवार यांनी काही शंका बोलून दाखवल्या आहेत. “प्रमोदराव हिंदूराव यांनी जी माहिती दिली, याचा अर्थ मी कुठंही खोटं बोललो नाही हे समोर येत आहे. जसं की 27 तारखेला तटकरे यांनी स्वतः सांगितले की तिथं स्वतः आलो, उशीरापर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला असे हिंदूराव सांगत आहेत. आणि मग उशीरा झाला. याचा अर्थ दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे. एका पॉलिटिकल कन्स्लटन्शीबाबत तिथं चर्चा झाली. योगायोग असा आहे की या पॉलिटिकल कन्स्टलन्शीने विमान सुद्धा विकत घेतलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रक्ट कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका होती. कदाचित त्यामुळे वाद विवाद झाला. सुनील तटकरे हे त्यावेळी तिथं होते. त्यामुळे दादांना उशीर झाला. उशीर झाला म्हणून दादा गाडीने जाण्याऐवजी विमानाने गेले,” असा घटनाक्रम रोहित पवारांनी सांगितला आहे.






