Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या समर्थनात्मक पोस्टवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. आंदोलनातील विद्यार्थ्यांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Jul 26, 2026 | 08:21 PM
'फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?' धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

'फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?' धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • फडणवीसांच्या पोस्टवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर
  • आंदोलनातील विद्यार्थ्यांचा उल्लेख करत सरकारवर टीका
  • सोशल मीडियावरील पोस्टमुळे नव्या राजकीय वादाला तोंड
 

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलकांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावरून आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून अश्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत सडकून टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून प्रधानांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. यावर रोहित पवार यांनीसुद्धा ‘X’ वर प्रत्युत्तर दिले असुन ‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.

‘धर्मेंद्र प्रधानांनंतर आता “टोलकरी गडकरीं”; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, गडकरींच्या राजीनाम्यावरून मोठ्या चर्चाना उधाण

काय म्हणाले रोहित पवार ?

रोहित पवार आपल्या सोशल मीडिया पोस्ट मधून म्हणाले, “मा. देवेंद्र फडणवीस साहेब, शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक आपण करत असाल, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं आपण सांगत असाल तर याला काय म्हणावं? राजीनामा त्यांच्या चुकीमुळे दिलेला नाही तर त्यांनी उपकार केला आहे, हे आपल्याला सुचवायचंय का?”

“गेले महिनाभर महिलांसह हजारो युवकांना लाठ्या काठ्या खाल्ल्या, २०-२५ दिवसांचं उपोषण करावं लागलं, काहींनी pellet gun चा सामना केला तर कुणी छर्रेच्या गोळ्या खाल्ल्या… आजही अनेक जण दवाखान्यात उपचार घेत आहेत, या सगळ्याबाबत आपल्याला कधी सहानुभूती वाटली नाही, पण आज धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती वाटत आहे.
किती अंधभक्ती करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक आपण करत असाल, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं आपण सांगत असाल तर याला काय म्हणावं? राजीनामा त्यांच्या चुकीमुळे दिलेला नाही तर त्यांनी उपकार केला आहे, हे आपल्याला सुचवायचंय का?
गेले… https://t.co/WOLj4m3MKp — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 26, 2026


पोस्टच्या शेवटी त्यांनी #अंधभक्तांचे_शिरोमणी म्हणत फडणवीसांना टोला लगावला. यावरून आता पुन्हा राजकीय टोलेबाजी सुरु झाली असून यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chhagan Bhujbal: ‘राजीनामा १५ दिवस आधी झाला असता तर…’, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य

काय म्हणाले होते फडणवीस ?

फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडिया पोस्ट करत म्हंटले,  “श्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पीएम श्री शाळांची स्थापना, परदेशात आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांपर्यंत विस्तार यांसारख्या अनेक सुधारणा राबवल्या.”

देश की शिक्षा क्षेत्र में कई महत्वपूर्ण सुधार करने का काम श्री धर्मेंद्र प्रधान जी इन्होंने किया. राष्ट्रीय शिक्षा नीति लागू करने में उनकी अहम भूमिका रही. पीएम श्री स्कूल, आईआईटी का विदेशों में विस्तार, प्रवेश परीक्षाओं का 19 भाषाओं तक विस्तार ऐसे कई सुधार उन्होंने किए.
व्यापक… https://t.co/W2BGjOcIn4
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 25, 2026


“व्यापक समाजकल्याणाप्रति आपली वचनबद्धता दर्शवत, त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले, हेच एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे लक्षण आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे.”

Web Title: Rohit pawar slams devendra fadnavis over dharmendra pradhan support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Dharmendra Pradhan
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘धर्मेंद्र प्रधानांनंतर आता “टोलकरी गडकरीं”; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, गडकरींच्या राजीनाम्यावरून मोठ्या चर्चाना उधाण
1

‘धर्मेंद्र प्रधानांनंतर आता “टोलकरी गडकरीं”; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, गडकरींच्या राजीनाम्यावरून मोठ्या चर्चाना उधाण

Chhagan Bhujbal: ‘राजीनामा १५ दिवस आधी झाला असता तर…’, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य
2

Chhagan Bhujbal: ‘राजीनामा १५ दिवस आधी झाला असता तर…’, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य

‘फडणवीस केंद्रात गेले तर धर्मेंद्र प्रधानांपेक्षाही जास्त…’; हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला
3

‘फडणवीस केंद्रात गेले तर धर्मेंद्र प्रधानांपेक्षाही जास्त…’; हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला

धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नितीन गडकरी टार्गेटवर? उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
4

धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नितीन गडकरी टार्गेटवर? उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.