Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उपसभापतीपदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि टीकाकारांना योग्य वेळी उत्तर देण्याचा इशाराही दिला.

  • By विवेक
Updated On: Jun 30, 2026 | 04:36 PM
Sachin Ahir, Anti Defection Law

Sachin Ahir, Anti Defection Law

Follow Us
Follow Us:
  • शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांची पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया
  • पत्रकार परिषदेआधी दाखल केला उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल
  • सोबत असलो तर चांगले,सोबत नसलो की नालायक, अशी भूमिका अत्यंत दुर्दैवी – सचिन अहिर
 

मुंबई : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र‘ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असताना, प्रवेशानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अहिर यांनी ठाकरे गटावर थेट निशाणा साधला.

उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले, “मी एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. कोळशातून हिऱ्याची चमक दिसते आणि त्या हिऱ्याला जवळ करण्याची संधी मिळाली तर त्यातून विश्वास निर्माण होतो. शिंदे यांनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी संधी देऊन सामान्य कार्यकर्ताही मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे दाखवून दिलं.”

‘उपसभापतीपदाची गरिमा जपणार’

अहिर यांनी उपसभापतीपदाच्या जबाबदारीबाबतही भूमिका स्पष्ट केली. “रासू गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून उल्लेखनीय काम केलं आहे. त्याच परंपरेची गरिमा जपत मीही काम करेन. ज्या भागात पक्ष संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत आहे, त्या ग्रामीण भागात जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करेन,” असे ते म्हणाले.

‘सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो…’; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’

राजकीय टीकेवर प्रतिक्रिया देताना अहिर यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “आम्ही सोबत असलो तर चांगले आणि सोबत नसलो की नालायक, अशी भूमिका घेतली जाते. ही अत्यंत दुर्दैवी मानसिकता आहे. माझ्यावर स्वार्थासाठी पक्ष बदलल्याची टीका होत आहे. ती होऊ द्या. योग्य वेळी योग्य व्यासपीठावर त्याला उत्तर देईन,” असा इशारा त्यांनी दिला.

‘ठाकरेंनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली’

आपल्या कामगिरीचा उल्लेख करताना अहिर म्हणाले, “आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली, ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीत मी काम केलं आहे. विधानसभा आणि मुंबई महापालिकेतील माझं योगदान तेथील नागरिकांना चांगलं माहीत आहे. काही लोकांना वाटतं, आम्हीच सर्वकाही आहोत आणि इतरांचं कोणतंही योगदान नाही; पण वस्तुस्थिती वेगळी आहे.”

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

ठाकरे गटाला आणखी एक धक्का

ठाकरे गटातील सहा खासदारांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर यांनीही पक्षांतर केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

Web Title: Sachin ahir first reaction after joining eknath shinde shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Sachin Ahir
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
4

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.