संजय निरुपम यांची घणाघाती टीका
मुंबई : इंडि आघाडीसोबत गेलेले आणि जिहादी लोकांच्या मतांसाठी उद्धव ठाकरे जिहादी मानिसिकतेचे झाले आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. बाळासाहेबांनी सामनाची स्थापना हिंदुसाठी केली होती मात्र आज तो जिहादी लोकांसाठी झाला आहे, असा हल्लाबोल निरुपम यांनी केला.
तामिळनाडूमधील मंदिरात दिप प्रज्वलन करण्यास मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती जी.आर स्वामीनाथन यांनी आदेश दिले होते, मात्र याविरोधात तामिळनाडूमधील जिहादी रस्त्यावर आले होते. तेथील डीएमके सरकारने दिप प्रज्वलन करण्यास बंदी घातली. यावर पुन्हा न्यायमूर्तींनी दिप प्रज्वलन करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यावरही डीएमके सरकारने सुप्रीम कोर्टातून स्थगिती आणली. या न्यायमूर्तींविरोधात डीएमके पक्षाने महाभियोग आणण्याचा प्रस्ताव संसदेत सादर केला आहे. या प्रस्तावावर हिंदू विरोधी पक्ष डीएमके, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरच उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनीही स्वाक्षरी केली. यावरुन निरुपम यांनी उबाठाच्या हिंदूविरोधी भूमिकेवर कडाडून टीका केली.
ते पुढे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर व्हावं, अशी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी लाखो शिवसैनिक कारसेवेसाठी गेले होते, असे बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व होते. मात्र त्यांचे सुपूत्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या खासदारांनी मंदिरात दिप प्रज्वलन करण्याविरोधात भूमिका घेतली. यावरुन उबाठाने हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली दिली आहे. मंदिरात दिप प्रज्वलन नाही करणार मग स्मशानात करणार का असा सवाल निरुपम यांनी यावेळी केला. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडल्यामुळेच विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंचा पराभव केला होता. उबाठा आता हिंदू विरोधी बनले आहेत, असा घणाघात निरुपम यांनी केला.
निरुपम म्हणाले की, उबाठा मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधुंचे हत्याकांड झाले होते. या काळात केंद्र सरकारने घुसखोरांविरोधात एनआरसी मोहीम राबवली त्यालाही उबाठाने विरोध केला होता. वक्फ बोर्ड सुधारणांनाही उबाठाने विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत उबाठा उमेदवाराच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाला होता. शिवसेना आणि भाजपाला हिंदुत्व शिकवण्यापेक्षा मुस्लिम मतांसाठी डीएमके, समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे जिहादी मानसिकतेचे झाले आहेत, असे उबाठाने आता जाहीर करावे, अशी टीका निरुपम यांनी केली.
Mumbai Drug Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त






