Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजपचा जल्लोष; ‘निर्लज्ज लोक’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाची घोषणा होताच महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. गिरीश महाजनांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला, तर महाजनांनी नाशिकच्या विकासाचा निर्धार व्यक्त केला.

  • By विवेक
Updated On: Aug 17, 2026 | 05:50 PM
Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Sanjay Raut Press Conference On Nitesh Rane :

Follow Us
Follow Us:
  • भरत गोगावले यांच्याकडे रायगड, तर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
  • नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजपकडून होणाऱ्या जल्लोषावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली.
  • गिरीश महाजनांनी आगामी महाकुंभ भव्य स्वरूपात होईल आणि नाशिकचा चेहरामोहरा बदलेल, असा दावा केला.
 

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारकडून दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आली आहे. तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाकडून जल्लोष करण्याची तयारी करण्यात आली आहे.

भाजपच्या जल्लोषावर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

दरम्यान, भाजपकडून करण्यात येणाऱ्या जल्लोषावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. पालकमंत्रिपद मिळाल्याचा इतका मोठा जल्लोष करण्याची गरज काय, असा सवाल करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची ‘सस्पेन्स’ अखेर संपली; ‘या’ दोन मातब्बर नेत्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी

पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील असताना नाशिक आणि रायगडच्या पदांवरून दिल्लीपर्यंत चर्चा का झाली, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला. या निर्णयामागे राजकीय तडजोड झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, “निर्लज्ज लोक आहेत. पहिल्यांदाच पालकमंत्रिपद मिळालं आहे का? यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे. हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असं म्हणतात. पण हा दोन जिल्ह्यांचा वाद अमित शाह यांच्याकडे न्यायचे, पंतप्रधानांकडे न्यायचे. याबाबत तडजोड झाली. मुंबईच्या भाषेत मांडवली झाली.”

गिरीश महाजन यांच्याशी आपले व्यक्तिगत वैर नसल्याचे सांगतानाच, नाशिकमधील विकासकामे, रस्त्यांची स्थिती आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी महाजनांना लक्ष्य केले. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणून कामे करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

SIR प्रक्रियेवर रोहित पवारांचा गंभीर आरोप; मतदारांचा हक्क धोक्यात असल्याचा दावा

गिरीश महाजन म्हणाले, ‘महाकुंभ न भूतो न भविष्य’

दुसरीकडे, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा मिळाल्यानंतर गिरीश महाजन यांनी आनंद व्यक्त केला. पंढरपूरमध्ये दर्शन घेत असताना पत्नीने कानात नाशिकचे पालकमंत्री झाल्याची बातमी सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महाजन म्हणाले की, यंदाचा महाकुंभ ‘न भूतो न भविष्य’ असा होईल. महाकुंभाच्या माध्यमातून नाशिकचा चेहरा-मोहरा बदलण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाकुंभाच्या तयारीपासून ते शहरातील पायाभूत सुविधांपर्यंत अनेक आव्हाने प्रशासनासमोर आहेत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्यासमोर नाशिकच्या विकासासोबतच महाकुंभाचे नियोजन ही मोठी जबाबदारी असणार आहे.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाल्यानंतर आता दोन्ही जिल्ह्यांच्या विकासकामांना किती वेग मिळतो आणि महायुतीतील या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Sanjay raut criticizes bjp girish mahajan nashik guardian minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • girish mahajan
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
1

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द
2

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप
3

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
4

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.