Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिनविरोधची धडपड, माघारनाट्य आणि १५० कोटींचा घोडेबाजार, संजय राऊतांचे महायुतीवर गंभीर आरोप; भाजपचा पलटवार

अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या असून शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि एका जागेवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे. यावरूनच आता संजय राऊत यांनी महायुती सरकारवर खळबळजनक आरोप केले आहेत.

  • By विवेक
Updated On: Jun 05, 2026 | 04:09 PM
Sanjay Raut Claims RSS Pushing Fadnavis to Delhi as Deputy PM.

Sanjay Raut Claims RSS Pushing Fadnavis to Delhi as Deputy PM.

Follow Us
Follow Us:

विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणुक अर्ज माघारी घेतल्याने १७ पैकी ५ जागा महायुतीने बिनविरोध मिळवल्याचे दिसत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून निवडणुका बिनविरोध करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे खळबळजनक आरोप त्यांनी केले आहेत.

कोकण विधान परिषद मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देवयानी डोणगावकर यांनीदेखील अर्ज मागे घेतला. अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या असून शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि एका जागेवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे. यावरूनच आता संजय राऊत यांनी महायुती सरकारवर खळबळजनक आरोप केले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून यावर भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले! विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे, कोकण, छ.संभाजी नगर, पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत,” अश्या शब्दात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

वि.परिषद निवडणूक:
काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले!
विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे,
कोकण
छ.संभाजी नगर
पुणे
येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत pic.twitter.com/G67c6TLnG8 — Sanjay Raut (@rautsanjay61) June 5, 2026

भाजपचा पलटवार

संजय राऊत यांच्या आरोपानंतर भाजनेसुद्धा पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बण यांनी संजय राऊतांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत म्हंटले कि, “जनाब संजय राऊत, माणसं सांभाळायला पैसे लागत नाही तर प्रेम लागतं. पण राऊत आणि त्यांच्या पक्षाला ना कार्यकर्ते सांभाळता आले, ना नेते टिकवता आले. कार्यकर्त्यांनी साथ सोडली, नेत्यांनी पक्ष सोडला आणि आता त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत.”

जनाब संजय राऊत,
माणसं सांभाळायला पैसे लागत नाही तर प्रेम लागतं.
पण राऊत आणि त्यांच्या पक्षाला ना कार्यकर्ते सांभाळता आले, ना नेते टिकवता आले. कार्यकर्त्यांनी साथ सोडली, नेत्यांनी पक्ष सोडला आणि आता त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. विधान परिषद… https://t.co/TLlWIY5zI5 — Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) June 5, 2026

ते पुढे म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीत १५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा खोटा आरोप केला आहे. पण नाशिकचे संपर्क प्रमुख म्हणून उबाठा गटाला साधा उमेदवारही देता आला नाही. त्यामुळे इतरांवर खोटे आरोप करण्यापूर्वी नाशिकमध्ये नेमके काय व्यवहार झाले? नाशिकच्या दौऱ्यांमध्ये राऊतांनी किती बॅगा भरून घरी आणल्या? उमेदवार का दिला नाही? याचं उत्तर राऊतांनी पत्रकार परिषदेत द्यावं. ज्यांच्या स्वतःच्या पक्षात उमेदवार उभा करण्याची ताकद नाही, त्यांनी लोकशाहीच्या नावाने आरोपांची खोटी आतषबाजी करू नये,” अशा शब्दांत त्यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला धक्का? उमेदवाराच्या माघारीनंतर सोनललक्ष्मी घाग यांची तीव्र प्रतिक्रिया

या पाच जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय

  • रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना)
  • यवतमाळ – दूष्यांत चतुर्वेदी ( शिवसेना)
  • वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली – अरुण लखानी (भाजप)

या १२ जागांवर होणार तुल्यबल लढत

  • अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)
  • नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध गोकुळ गीते (अपक्ष)
  • सातारा -सांगली – धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
  • नागपूर – अतुल लोंढे (काँग्रेस) विरुद्ध डॉ. राजीव पोतदार (भाजप)
  • सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
  • नांदेड – रामदास पाटील (काँग्रेस) विरुद्ध अमर राजूरकर (भाजप)
  • भंडारा – गोंदिया – नरेश ईश्वरकर (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध दिलीप बनसोड (काँग्रेस)
  • अमरावती – प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध हर्षजीत देशमुख (काँग्रेस) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित)
  • परभणी हिंगोली – सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (शिवसेना उबाठा)
  • धाराशिव – लातूर – बीड – बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
  • जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (शिवसेना उबाठा)
  • छत्रपती संभाजीनगर – सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (शिवसेना उबाठा)
MLC Election : महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर; काँग्रेसने दिला ‘हा’ इशारा

Web Title: Sanjay raut slams mahayuti government over financial dealing in vidhan parishad election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • BJP
  • sanjay raut
  • shivsena
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
2

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
3

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
4

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.