महाविकास आघाडीला धक्का? उमेदवाराच्या माघारीनंतर सोनललक्ष्मी घाग यांची तीव्र प्रतिक्रिया
तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या घडामोड्या; नितीन नबीन यांनी मंजूर केला अण्णामलाई यांचा राजीनामा
यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारामागे उभा राहिला असता. ज्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत संधी दिली, विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली, त्याच पक्षाला अडचणीत आणणारे नेते कोणत्याही पक्षात दीर्घकाळ समाधानाने राहू शकत नाहीत, असे मत सोनललक्ष्मी घाग यांनी व्यक्त केले आहे.
भविष्यात अशा अविश्वसनीय उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या नावाखाली प्रचार करण्यापेक्षा काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा गंभीरपणे विचार करणे अधिक योग्य ठरेल. देशात सध्या भाजपविरोधी राजकारणाला बळ मिळत असून महायुतीतही अंतर्गत मतभेद आणि धुसफूस स्पष्टपणे दिसून येत आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला असल्याची चर्चा आहे. तसेच घराणेशाहीविरोधातील वाढता जनक्षोभ लक्षात घेता भाजपने बदलाचे वारे ओळखले आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला राजकीय दबाव किंवा घोडेबाजाराच्या माध्यमातून माघार घ्यायला लावणे म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणाची अप्रत्यक्ष कबुली देण्यासारखे आहे, असेही सोनललक्ष्मी घाग यांनी स्पष्ट केले आहे.
विश्वासघातावर संताप: ऐनवेळी उमेदवाराने माघार घेतल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि पक्षाच्या विचारांचा मोठा अपमान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पक्षाशी बांधिलकी: वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा दबावाखाली येऊन पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनतेने आणि कार्यकर्त्यांनी धडा शिकवला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
भविष्याची दिशा: अशा माघारीमुळे पक्षाचे खच्चीकरण होणार नसून, आगामी काळात अधिक ताकदीने आणि एकजुटीने लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.






