Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उद्धव ठाकरेंचा हिंदूंशी आता काडीमात्र संबंध नाही’; ठाकरे गटाच्या ‘राम रक्षा आंदोलनावर’ संजय शिरसाटांचा पलटवार

उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैपासून 'राम रक्षा आंदोलन' सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. "राजकारणासाठी आता हिंदूंची गरज पडली आहे. आधी हनुमान चालीसा वाचून माफी मागा," असा टोला त्यांनी लगावला.

  • By विवेक
Updated On: Jul 03, 2026 | 03:51 PM
'उद्धव ठाकरेंचा हिंदूंशी आता काडीमात्र संबंध नाही'; ठाकरे गटाच्या 'राम रक्षा आंदोलनावर' संजय शिरसाटांचा पलटवार

'उद्धव ठाकरेंचा हिंदूंशी आता काडीमात्र संबंध नाही'; ठाकरे गटाच्या 'राम रक्षा आंदोलनावर' संजय शिरसाटांचा पलटवार

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैपासून राज्यभर ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या या भूमिकेवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे.

‘राजकारणासाठी आता हिंदूंची गरज पडली’

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील दानपेटीतील पैशाचा वापर पक्ष फोडण्यासाठी झाल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “राजकारणासाठी पैसा वापरला जातो, असे बोलणे बालिशपणाचे आहे. पूर्वी राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा वाचली म्हणून त्यांना अटक करण्यात आली. आता स्वतः हनुमान चालीसा वाचणार आहात. तुमच्या राजकारणासाठी आता हिंदूंची गरज पडली आहे.”

‘महाविकास आघाडीतील मित्रांना तुमचं हिंदुत्व मान्य आहे का?’

शिरसाट यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहून हिंदुत्वाचा नारा देता. आधी त्यांना विचारा की तुमचं हिंदुत्व त्यांना मान्य आहे का? दादरला जाऊन हनुमान चालीसा वाचा आणि आपल्या चुकांसाठी हनुमानाची माफी मागा.”

Uddhav Thackeray PC: राममंदिराच्या दानाची चोरी करून पक्ष फोडले; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप, ‘रामरक्षा आंदोलना’ची घोषणा

‘राम मंदिर आंदोलनाचे श्रेय बाळासाहेबांचेच’

राम मंदिर आंदोलनाचा उल्लेख करत शिरसाट म्हणाले, “राम मंदिराच्या रथयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. बाबरी ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसैनिकांनी हे केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे’ असे वक्तव्य केले होते. त्या भूमिकेचे श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच जाते. त्याचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका.”

‘हिंदूंशी आता काडीमात्र संबंध नाही’

उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर शेवटी टीका करत शिरसाट म्हणाले, “संघर्षाच्या काळात आम्ही अयोध्येला गेलो होतो. रामाच्या नावावर राजकारण करण्याची नवी दिशा देऊ नका. हिंदूंशी तुमचा आता काडीमात्र संबंध उरलेला नाही. आधी स्वतःचा पक्ष सावरावा, आजूबाजूच्या लोकांना जागं करावं आणि त्यानंतर देशाचा विचार करावा.”

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून ५ जुलैपासून राज्यव्यापी ‘राम रक्षा आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

खासदार फुटीनंतर ठाकरे आणखी आक्रमक

‘ऑपरेशन टायगर‘ मध्ये उद्धव ठाकरे यांना आपले सहा खासदार आणि एक विधान परिषद आमदार गमवावा लागला. शिवसेना शिंदे गटात फुटीर खासदारांनी प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अधिक आक्रमकपणे शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरेंनी सभा घेत शिंदेगटावर टीकास्त्र सोडले. आता त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून विरोधकांना लक्ष केले असून ते राम रक्षा आंदोलन सुरु करणार आहेत. यावरून आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून शिवसेना शिंदे गटाकडूनदेखील यावर प्रतिक्रिया आली आहे. या आंदोलनामुळे राज्यातील राजकी

Web Title: Sanjay shirsat reaction on uddhav thackeray ram raksha andolan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Sanjay Shirsat
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
1

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची  ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी
3

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
4

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.