Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray PC: राममंदिराच्या दानाची चोरी करून पक्ष फोडले; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप, ‘रामरक्षा आंदोलना’ची घोषणा

Uddhav Thacekray PC: मंदिरातील दान चोरी घोटाळ्याप्रकरणी जाब विचारण्यासाठी हे राम रक्षा आंदोलन करणार आहोत.  मंदिर होण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांच रक्त वाया जाऊ देणार नाही. हिंदूंच्या भवनांशी खेळणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही मंदिर लुटारूंना आता हिंदू माफ नही करेगा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 03, 2026 | 02:38 PM
उद्धव ठाकरे यांचा शिंदे यांच्यावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचा शिंदे यांच्यावर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

Uddhav Thackeray Press conference :  “भाजपचे सुरुवातीला दोनच खासदार होते. पण राममंदिराच्या मुद्द्याचे भांडवल करून भाजपवाले हिंदुत्त्वाकडे आले. आज ते देशात सत्ता उपभोगत आहेत. भाजपवाले आता ऑपरेशन राम मंदिर करत आहे का? राममंदिरालाच मिळालेल्या दानाची चोरी करून  चोरीचा पैसा ते पक्ष फोडण्यासाठी वापरत आहेत. राम मंदिरावर दरोडा टाकला जातोय.” असा आरोप करत माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे.

येत्या रविवारी (5 जुलै) दादर येथील हनुमान मंदिरासमोर दुपारी चार वाजता  हे आंदोलन होणार आहे.  राम मंदिर आणि रामावर प्रेम कऱणाऱ्या  राम भक्तांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.  दादरमधील हनुमान मंदिरांसमोर दुपारी चार वाजता रामरक्षा स्त्रोत्र आंदोनल करणार, तमाम हिंदू आणि रामभक्तांना या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करत आहे. हनुमान चालीसा, मारुती स्त्रोत्र देखील म्हणणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी ‘प्रीमियम टॉयलेट’; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ” आज संपूर्ण देश भाजपच्या अंमलाखाली आहे.  भाजपचे मूळ ज्यात  आम्ही देखील सहभागी होतो, ते मुळ म्हणजे राम मंदिर.  राम मंदिरासाठी जे आंदोलन झाले त्यात अनेक शिवसैनिक देखील सामील झाले होते. त्यात अनेक हिंदू आणि रामभक्तही होते. पण त्यानंतर झालेले  कारसेवकांवर झालेले अत्याचार, गोधरा कांड, अहमदाबाद दंगल,  मुंबईत झालेले बॉम्बस्फोट. या सगळ्या घटनांमध्ये हिंदूनी खूप काही सोसलं होतं.

या सगळ्या घडामोडींपूर्वी भाजपचे देशात केवळ दोनच खासदार होते. भाजपने त्यांची मूळ विचारसरणी सोडून हिंदुत्त्वाकडे वळले आणि राम मंदिराच्या मुद्द्याचे भांडवलं करून ते आज देशात अमर्याद सत्ता भोगत आहेत. पण आता राम मंदिरातील  दान चोरीचा मुद्दा चर्चिला जात आहे,हे दुर्दैव आहे.आज जी  दरोडेखोरी चालली आहे. आमदार-खासदार फोडले जात आहेत, खरेदी विक्री  केली जात आहे. त्याला ऑपरेशनचे नाव दिले जात आहे. पण भाजपकडून ऑपरेशन राम मंदिर  सुरू आहे का, असा  सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

याच्या बातम्या दाखवल्या जात असतील किंवा नसतीलही पण मंदिरातील दानाची चोरी तर नक्कीच सुरू आहे.  मंदिरावर दरोडा टाकला गेला आहे, त्याचे पुरावेदेखील दिले जात आहे. पण हा चोरीचा पैसाच पक्ष आणि आमदार खासदार फोडण्यासाठी वापरला जात आहे, हे फार गंभीर आहे.

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले

राम मंदिर चोरीला आता हिंदू माफ करणार नाही.  जे मंदिर लुटत आहेत, ते भाजपचे असोत किंवा इतर कोणी असोत त्यांना हिंदू कदापि माफ करणार नाहीत.  मंदिर होण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांच रक्त वाया जाऊ देणार नाही. हिंदूंच्या भवनांशी खेळणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. याची सुरूवात आम्ही करत आहोत.  दादर येथील हनुमान मंदिरासमोर तमाम हिंदुना आम्ही आमंत्रित करत आहोत. तिथे  पक्षाचा विचार न करता आणि तमाम हिंदू आणि राम भक्तांना, भाजपच्या कालखंडात हिंदुत्तवच धोक्यात आले आहे, यासाठी ज्यांनी मोर्चे काढले होते.  अशा सर्वांना आम्ही आमंत्रित करत आहोत.” असं  उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

 

Web Title: Uddhav thackeray announces ram raksha andolan dadar hanuman temple july 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.