सातारा जिल्हा बँकेत भाजपला जोरदार धक्का!; शिवसेना-राष्ट्रवादीने काढला पराभवाचा वचपा
पण भाजपला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी भाजपला बाजूला ठेवत मंत्री जयकुमार गोरे यांना चितपट केल आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी उदयसिंह पाटील यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी दीपक चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. या दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा बँकेच्या सत्तास्थापनेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे संचालक निवडून आल्याने अध्यक्षपदाचा निर्णय कोणाच्या बाजूने जाणार, याबाबत उत्सुकता होती.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांपैकी भाजपचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि शिवसेनेचे ४ संचालक निवडून आले होते. बँकेचे संचालक आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी चर्चाही सुरू झाली होती. तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाणार असल्याची भूमिका मांडली.
काही वर्षांपूर्वी सातारा जिल्हा बँकेवर यापूर्वी दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचे वर्चस्व होते. पण साताऱ्याच्या राजकारणात अजित पवार यांचे वर्चस्व वाढल्यानंतर उंडाळकर यांचे वर्चस्व संपले आणि बँकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यानंतर अलीकडेच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते उदयसिंह पाटील बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले. उदयसिंह पाटील हे सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य असून, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात.
Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या
जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले दीपक चव्हाण हे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक मानले जातात. त्यांनी फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही काम केले आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने दीपक चव्हाण यांना सहकार क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळाली असून, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली आहे.
Ans: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.
Ans: बँकेच्या २१ संचालकांपैकी भाजपचे सर्वाधिक ९ संचालक निवडून आले होते; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि शिवसेनेचे ४ संचालक एकत्र आल्याने त्यांचे १२ जणांचे बहुमत झाले आणि भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले.
Ans: पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक पातळीवर सूत्रे हलवत भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.






