Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा

सातारा येथील गांधी मैदानावर शिंदे गटाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री Eknath Shinde पहिल्यांदाच येथे जाहीर सभा घेणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 19, 2026 | 05:57 PM
‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा

‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा शहरातील गांधी मैदानावर सोमवारी होणारा शिवसेना (शिंदे गट)चा भव्य मेळावा केवळ शक्तिप्रदर्शनापुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांना थेट धक्का देणारा ठरण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच साताऱ्यात जाहीर सभा घेत असल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या मेळाव्यामागे दोन स्पष्ट उद्दिष्टे दिसून येत आहेत. साताऱ्यात शिवसेनेला नव्याने ताकद देणे आणि नाराज-निष्ठावंत शिवसैनिकांना पुन्हा सक्रिय करून संघटनात्मक बांधणीला गती देणे. जिल्हा परिषद सत्तेच्या समीकरणात संख्याबळाचे गणित चुकल्याने शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेबाहेर राहिली. हा राजकीय धक्का अजूनही ताजा असतानाच शिंदे गटाने संघटना मजबूत करण्यासाठी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

प्रियांका चतुर्वेदी ठाकरेंची शिवसेना सोडणार?; ‘ते’ समर्थन ठरतंय चर्चेचं कारण…

साताऱ्यात सध्या शिवसेनेचे दोन आमदार पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि कोरेगावचे महेश शिंदे—हेच पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. मात्र, जिल्हा परिषद सत्तानाट्यात आमदार महेश शिंदे यांनी भाजपच्या गोटातून पत्नीला अध्यक्षपद मिळवून दिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत पक्षातच कुजबुज सुरू झाली आहे. ‘तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत, पण मनाने भाजपमध्ये’ अशी चर्चा उघडपणे रंगू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर या मेळाव्यात आमदार महेश शिंदे उपस्थित राहणार का, हा खरा कळीचा मुद्दा ठरला आहे. पाटण येथील कोयना डोंगरी महोत्सवात उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित असतानाही महेश शिंदे अनुपस्थित राहिल्याने राजकीय संकेत स्पष्ट झाले होते. त्यामुळे गांधी मैदानावरील मंचावर त्यांची उपस्थिती की अनुपस्थिती—दोन्ही परिस्थितींना वेगळे राजकीय अर्थ निघणार आहेत.

दरम्यान, या मेळाव्यातून शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व अधोरेखित करत भाजपसमोर ‘डोळ्याला डोळा’ देण्याची भूमिका घेण्याचे संकेत दिले जात आहेत. शिवसैनिकांना ‘चार्ज’ करून आगामी निवडणुकांसाठी सज्ज करण्याचा स्पष्ट प्रयत्न या शक्तिप्रदर्शनातून दिसत आहे.
गांधी मैदान हे परंपरेने भाजपच्या प्रभावाखालील क्षेत्र मानले जाते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रभाव असलेल्या या बालेकिल्ल्यात शिंदे गटाचा मेळावा होणे, हीच एक मोठी राजकीय चाल मानली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख ‘बोलतात कमी, करतात जास्त’ अशी आहे. त्यामुळे ते या सभेत केवळ संघटनात्मक घोषणा करतील की महायुतीतील ताणतणावावर थेट भाष्य करत नवा राजकीय संदेश देतील, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकंदरीत, हा मेळावा केवळ सभा नसून साताऱ्यातील सत्तासमीकरणे बदलण्याची ‘ट्रेलर’ ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष लागले आहे.

‘चिल्लर’ म्हणत नवनीत राणा यांनी केली विजय वडेट्टीवारांवर टीका; ‘काँग्रेसने हिरवे विषारी साप…’

Web Title: Satara shiv sena shinde group rally political equations news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Satara
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
1

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
2

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
3

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.