
Shaktipeeth Mahamarg New Route Map 2026, Maharashtra Expressway Updates,
जुन्या नकाशानुसार, शक्तीपीठ द्रुतगती मार्ग वर्ध्यातील पवनारपासून गोवा सीमेवरील पात्रदेवीपर्यंत जाण्याचा प्रस्ताव होता. तथापि, नवीन मार्गानुसार, तो आता वर्ध्यातील दिगराजपासून सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी (बांदा) येथे पोहोचेल. या बदलामुळे द्रुतगती मार्गाची लांबी ८०२ किमी वरून ८५६.७६५ किमी झाली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
शक्तीपीठ महामार्गात सर्वात मोठे बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये दिसून आले आहेत. पूर्वी सावंतवाडीतील आंबोली, गेले, फणसवडे इत्यादी १० गावांचा समावेश होता, पण आता ती वगळण्यात आली आहेत. त्याऐवजी केगड (चौकुळ), देगवे, बांदा, पाडवे माझगाव या गावांचा शक्तीपीठ महामार्गात समावेश करण्यात आला आहे. तर, हा मार्ग आता दोडामार्ग तालुक्यातील कुंभवाडे, भेकुर्ली, कोलझार, तालकट आणि झोळंबे या गावांतून जाईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ आणि हातकणंगले यांसारखे महत्त्वाचे भाग या योजनेतून वगळण्यात आले आहेत. हा मार्ग आता आजरा-चांदगड-दोडामार्ग मार्गे बांदाला जोडला जाणार आहे. शिवाय, नव्या मार्गात प्रथमच सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूरकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यात आले आहेत, तर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या मार्गांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बदल करण्यात आले आहेत.
हा महामार्ग राज्यातील १३ जिल्हे आणि ४० तालुक्यांना जोडेल, ज्यात २१ महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास केवळ आठ तासांत पूर्ण करणे शक्य होईल. पण यावरुनही पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हा नवीन मार्ग एका पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातून जातो. घनदाट जंगल आणि जैवविविधतेने समृद्ध भागातून जाणारा हा रस्ता वन्यजीवांसाठी धोकादायक ठरू शकतो, असा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पवनार (वर्धा) ते बांदा (सिंधुदुर्ग) या ‘शक्तीपीठ महामार्गा’चा सुधारित प्रस्ताव सादर केला असून, यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. नव्या आखणीमुळे भूसंपादनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Telangana Crime: विकृत मानसिकतेचा कळस! मुलगाच हवा आहे म्हणत बापानेच मुलींसह पत्नीचा जीव घेतला
वेगवान प्रवास: सध्या नागपूर ते गोवा या प्रवासाला साधारण १८ तास लागतात. या महामार्गामुळे हे अंतर कापण्यासाठी केवळ ८ तास लागतील, ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.
विस्तीर्ण जाळे: ८५६.७६५ कि.मी. लांबीचा हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर (Solapur), सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण १३ जिल्ह्यांमधून जाणार आहे.
धार्मिक पर्यटनाला चालना: हा मार्ग माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या प्रमुख तीन शक्तीपीठांसह राज्यातील एकूण २१ धार्मिक स्थळांना जोडणारा ठरणार आहे.