Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

गेल्या चार वर्षांत राज्यातील प्रादेशिक पक्ष भाजप प्रणित एनडीएमध्ये सामील होताना दिसत आहेत. त्यातच आमदार खासदारांच्या फुटण्यामुळे पक्षांचे राजकीय समीकरणही बदलून गेले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 30, 2026 | 12:25 PM
Maharashtra political crisis 2026, NCP Congress merger, NCP NDA alliance rumors

Maharashtra political crisis 2026, NCP Congress merger, NCP NDA alliance rumors

Follow Us
Follow Us:

NCP Merger: राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोटातूनही तशाच काहीशा बातम्या पसरू लागल्या आहेत. या अंतर्गत बंडाळीवर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटात काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या चर्चा सुरू आहेत. तोच दुसरीकडे एक गट एनडीए मध्ये विलीनीकरण करण्याची मागणी करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या चार वर्षांत राज्यातील प्रादेशिक पक्ष भाजप प्रणित एनडीएमध्ये सामील होताना दिसत आहेत. त्यातच आमदार खासदारांच्या फुटण्यामुळे पक्षांचे राजकीय समीकरणही बदलून गेले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर आमदारदेखील फुटणार असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जाऊ लागला. खासदारांच्या फुटीमुळे ठाकरे पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनही अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबाबतही अशा चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादी विलीन करण्याच्या विचारात आहेत. त्यातही आमदारांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी धक्का! आमदार सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदाच्या शर्यतीत एन्ट्री

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार काँग्रेसमध्ये विलीन होण्याची मागणी करत आहेत, तर दुसरा गट भाजपमध्ये विलीन व्हावे, अशी मागणी करत आहेत. मतदारसंघातील कामे होत नसल्यामुळे आमदारांची अडचण होते, असे आमदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही अधिकृत भूमिका मांडली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनाही काँग्रेससोबत एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तृणमूल काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पातील भूसंपादन वाद अंतिम टप्प्यात; 

सूत्रांच्या माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यात प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात ममता बॅनर्जी १५ ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

दरम्यान, महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याच्या शक्यतेवर केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक चालना मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातही या मुद्द्यावर वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेतृत्व या विषयावर कोणती भूमिका घेते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीबाबतच्या चर्चांमुळे आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title: Maharashtra political crisis will sharad pawars ncp merge with congress or bjp led nda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Maharashtra Politics
  • NCP News
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
3

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
4

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.