
Maharashtra Political Crisis 2026, Jayant Patil Vinod Tawde Meeting, Sharad Pawar
दिल्लीहून दोन दिवसांपूर्वी मुंबईत परतल्यानंतर पवार यांना हाताला झालेल्या दुखापतीमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती; मात्र डॉक्टरांनी अधिक विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांना अद्याप रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पवार यांना नियमित तपासणीसह काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या विविध तपासण्या सुरू असून, अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती स्पष्ट होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. वयोमान आणि अलीकडील आरोग्यस्थिती लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले असून, सर्व वैद्यकीय अहवालांनंतर पुढील उपचार किंवा डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
गेल्या महिन्यातही प्रकृती अस्वस्थ झाल्याने पवार यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. रुग्णालयात दाखल असल्यामुळे पवार त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाहीत. बारामतीमध्ये होणारी प्रचाराची सांगता सभा महत्त्वाची मानली जात असताना, प्रकृतीच्या कारणास्तव ते या सभेला अनुपस्थित राहणार आहेत.