बारामतीच्या सांगता सभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण दिले (फोटो - एक्स)
Baramati by election : बारामती : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार या बारामतीच्या रिंगणात उतरल्या आहेत. बारामतीमध्ये प्रचाराची सांगता सभा पार पडत आहे. अभूतपुर्व अशा या सभेमध्ये महायुतीच्या मंचावर खासदार सुप्रिया सुळे देखील दाखल झाल्या आहेत. सुनेत्रा वहिनींसाठी सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी प्रचाराच्या सांगता सभेमध्ये सहभाग घेतला आहे.
महायुतीच्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन बारामतीकरांना केले.
हे देखील वाचा : पुणे रेल्वे स्थानकाला RPF जवानांचे सुरक्षा कवच; हरवलेल्या ४१२ मुलांना केले पालकांकडे सुपूर्त
बारामतीच्या सांगता सभेमध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सांगता सभेची परंपरेचा देखील त्यांनी उल्लेख केला. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामतीकरांचं आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. वहिनी आणि मुलांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आपल्या घरातील कर्ता पुरुश आपल्यात नाही हे दुःख मनात आहे. गेली अडीच वर्ष आपल्या सर्वांसाठी अडचणीची गेली आहेत. महाविकास आघाडीचा कार्यकर्ता वहिनींसोबत ताकदीनं उभा राहिलं. सुनेत्रा वहिनींना मी महाविकास आघाडीकडून शब्द देते, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी मंचावरुन दिले.
हे देखील वाचा : “दादा खरंच गेलाय का…? तो शेवटचा फोन अन् भेट; MP सुप्रिया सुळेंनी मांडल्या भावना
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवारांनी मागील 35 वर्षांपासून पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने या बारामतीची सेवा केली आहे. त्यांनी बारामतीची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. बारामतीकरांनी कधीच पवारांची साथ सोडली नाही. यामुळे मी तुमच्या सर्वांसमोर महाविकास आघाडी यांच्यावतीने मी सर्वांना मनापासून शब्द आणि शुभेच्छा देण्यासाठी आले आहे. माझी तर इच्छा होती की बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. निवडणूकच होऊ नये. मी निवडणूक जाहीर झाल्या झाल्या हे सांगितले होते की वहिनींची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. दुर्दैव आहे की काही लोकांचे फॉर्म अजूनही राहिले. हे बारामती पोटनिवडणुकीचे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्यामनात तीळमात्र शंका नाही,” असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.






