Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त

शिवसेना ने निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी राज्यात सव्वा लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्त केले आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘प्रत्येक बूथवर शिवसेना मजबूत’ या उद्दिष्टाने कार्यकर्त्यांनी BLA ला सहकार्य करण्याचे आवाहन केले. नांदेड येथे शिवसंवाद दौऱ्यात त्यांनी या मोहिमेचा आढावा घेतला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 28, 2026 | 06:15 PM
मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त

मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येक बूथ, शिवसेना मजबूत ! या निर्धाराने काम करा
  • शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
  • शिवसंवाद दौऱ्यात नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा आढावा
हदगाव : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण मोहीमेसाठी शिवसेना पक्षाने राज्यात जवळपास सव्वा लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्त केले आहेत. बीएलए नियुक्ती केवळ मतदार यादी पुनरीक्षण मोहीमेपुरता नसून तो १२ महिने सक्रिय राहील. तो मतदार यादीवर काम करेल. ‘प्रत्येक बूथवर शिवसेना मजबूत’ या निर्धाराने कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ‘बीएलए’ला सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना ससंदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदार संघाचा खासदार डॉ. शिंदे यांनी गुरुवारी आढावा घेतला. या बैठकीला आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

खासदार डॉ. शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यात तीन बैठका घेतल्या. यात जिल्ह्यातील नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, लोहा कंधार, नायगाव, मुखेड, देगलूर, किनवट, हदगाव, भोकर या विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मतदान पुनरीक्षण मोहीमेबाबत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गंभीर आहेत. त्यांच्या आदेशाने राज्यात पक्षाकडून सव्वा लाखांहून अधिक ‘बीएलए’च्या नियुक्त्या केल्या आहेत. या संपूर्ण मोहीमेवर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाकडून संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुखांच्या नेमणुका केल्या आहेत. ‘बीएलए’ मतदार याद्या तपासणार आहे. आपल्या मतदारांची नावं यादीत आहे की नाहीत याबाबत ‘बीएलए’ माहिती देण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे एसआयआर मोहीमेत कार्यकर्त्यांनी ‘बीएलए’ला सहकार्य करावे. हे झाले तर प्रत्येक बूथवर शिवसेना मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

Maharashtra tourism : घोडेवाले, फोटोग्राफर, विक्रेत्यांना ड्रेस कोड बंधनकारक, पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी पाचगणीत नवा नियम

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मंत्र्याला दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. मंत्री प्रकाश आबिटकर यांना नांदेड जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पक्ष पोहोचला पाहिजे, यासाठी शिंदे साहेबांनी नियुक्त्या केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांनी जिथे पक्ष संघटना कमकुवत असेल तिथे लक्ष देऊन संघटना मजबूत करण्याला प्राधान्य द्यावे. तेथील कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून त्या संपर्क प्रमुखांच्या निदर्शनात आणून द्याव्यात. पक्षाचे नेते शिंदे साहेब स्वत: १८ तास काम करतात. पक्ष नेतृत्वाचे सामान्य कार्यकर्त्यावर लक्ष आहे. जो काम करेल त्याला पद मिळेल, या विचाराने पक्षाचे काम सुरु आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

खासदार डॉ. शिंदे यांची उबाठावर टीका

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील आढावा बैठकीत खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम करत आहेत. यापूर्वी मराठवाड्यात शिवसेना नेतृत्वाने कधीही रस्त्यावर उतरुन काम केलं नाही, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठावर केली. मात्र आता पक्षानं विचार बदलला आहे. आज ४५ डीग्री तापमानात देखील शिवसंवादच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलो. आम्ही झिरो लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते आहोत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने यापूर्वी नाशिक, ठाणे, जालना या जिल्ह्यात विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला, असे ते म्हणाले.

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन

Web Title: Shiv sena appoints over one lakh bla for voter list revision drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • Shiv Sena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई
2

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
3

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
4

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.