Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Protest: ‘मर्सिडीज द्या, टेंडर घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; नेत्यांच्या वाहनावरून महापालिकेत गदारोळ

Shiv Sena Protest: सभागृह नेत्यांना कंत्राटदाराकडून मर्सिडीज वाहन उपलब्ध करून दिल्याच्या मुद्द्यावरून महापालिकेतील राजकारण तापले आहे. या प्रकाराचा निषेध करत शिवसेनेने ‘मर्सिडीज द्या, टेंडर घ्या ’ अशी घोषणा देत आंदोलन केले. कंत्राटदाराने लोकप्रतिनिधींना वाहन उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून सभागृहातही गदारोळ झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 01:35 PM
‘टेंडर द्या, मर्सिडीज घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; कंत्राटदाराच्या वाहनावरून महापालिकेत गदारोळ

‘टेंडर द्या, मर्सिडीज घ्या!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन; कंत्राटदाराच्या वाहनावरून महापालिकेत गदारोळ

Follow Us
Follow Us:
  • कंत्राटदाराच्या वाहनावरून राजकारण तापले
  • मर्सिडीज द्या, टेंडर घ्या घ्या म्हणत शिवसेनेचे आंदोलन
  • सभागृह नेत्यांना कंत्राटदाराने दिलेल्या वाहनावरून गदारोळ
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : पालिकेची शुक्रवार (21 ऑगस्ट 2026) आज रोजी असलेली महासभा आंदोलनाने गाजली. काही दिवसांपूर्वी भाजपाचे सभागृह नेते सागर नाईक यांच्याकडे असलेल्या मर्सिडीज वाहनावरून शिवसेनेने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तुर्भे येथील कचरा प्रकल्पाचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले आहे. त्या कंत्राटदारांच्या नावावर सभागृह नेते सागर नाईक वापरत असलेली मर्सिडीज गाडी रजिस्टर आहे. मुख्य म्हणजे गाडी रजिस्टर झाल्यावर दुसऱ्याच दिवशी संबंधित कंत्राटदारासोबत पालिकेने एग्रिमेंट केल्याचा आरोप शिवसेनेने (Shiv Sena Protest) केला आहे. या निषेधार्थ शिवसेनेचे सर्व ४२ नगरसेवक शुक्रवारी पालिकेत निषेधाचे जॅकेट घालून आले होते. यावर कचरा शेठचा निःशेष असो, मर्सिडीज द्या, टेंडर घ्या अशी टीका करणारी वाक्ये यावर लिहिली होती.

 

, कंत्राटदाराच्या ऐवजी ते टाकावे.

प्रकल्प नेण्याचा अट्टहास

यावेळी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांची मनमानी आम्ही चालू देणार नाही. कचऱ्याचे कंत्राट सरळ सरळ देऊन गाड्या घेतल्या जात आहेत. स्पष्ट भ्रष्टाचाराचे उदाहरण दिसून येत आहे. सभागृहात आम्ही स्वच्छ कारभार करतो असे सांगायचे आणि दुसरीकडे गाड्या घ्यायच्या. भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबईचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे कचऱ्यातून भ्रष्टाचार करायचा. असा कारभार सध्या दिसून येत आहे.आमचे सुरेश कुलकर्णी या जागेला विरोध करत आहेत.

तेथील नागरिकांना या प्रकल्पामुळे त्रास होणार आहे. मात्र तरीही रेटून तिथेच हा प्रकल्प नेण्याचा अट्टहास केला जात अशी टीका चौगुले यांनी केली. तर शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी देखील भाजपाच्या कारभारावर आगपाखड केली. ते म्हणाले की, नवी मुंबईतील झोडपट्टीवासीयांबाबत आत्मियता उरलेली नाही.

Navi Mumbai News: डी-मार्ट सर्कलपासून रेल्वे स्थानकापर्यंत वाहतूककोंडी; कर्मचारी नेमके कुठे? नागरिकांमध्ये नाराजी

कंत्राटदाराला वर्क ऑर्डर कशी मिळाली?

भ्रष्टाचार करू मात्र प्रकल्प तिथेच राबवू अशी पद्धत सत्ताधाऱ्यांची दिसून येते. आम्ही हे मर्सिडीज प्रकरण, लाचलुचपत खात्याकडे नेणार आहोत. न्यायालयात देखील दाद मागणार आहोत. ही मर्सिडीज त्यांनी कशी घेतली, गाडी आल्या आल्या त्या कंत्राटदाराला वर्क ऑर्डर कशी मिळाली याची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत अशी टीका पाटकर यांनी केली. सागर नाईक यांच्यामुळे भाजपाचे नाव खराब होत आहे. त्यांचा मनमानी कारभार सभागृहामध्ये दिसून येतो अशी टीका पाटकर यांनी केली.

तुर्भे येथील प्रकल्पाला विरोध

बनावट स्टे ऑर्डरमध्ये देखील सागर नाईक आहेत. त्यांची कागदपत्रे पोलिस आम्हाला देत नाहीयेत. संविधानिक पदावरील व्यक्ती असे वाहन वापरू शकत नाही सात वर्षांचा गुन्हा आहे असेही पाटकर म्हणाले. सभागृहात आमची काय त्यांच्या नगरसेवकांची देखील कामे होत नाहीत. त्यांचे नगरसेवक देखील शंकर असल्याचा खुलासा पाटकर यांनी केला. यावेळी तुर्भे येथील प्रकल्पाला विरोध करणारे स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी देखील भाजपच्या टीका केली. आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, प्रकल्पाची जागा बदलावी असे कुलकर्णी म्हणाले. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार यातून दिसून येत असल्याची टीका कुलकर्णी यांनी केली.

विरोधकांचा आक्षेप कशावर आहे हे मला कळलेले नाही. त्याच दिवशी रजिस्ट्रेशन झाले असल्यास त्यात काही तथ्य नाही. मी ही वाहन कधीकधी वापरतो. त्या कंपनीला ठेका मिळाला आहे. त्यांच्यासोबत मी आहे असे नाही. हे सर्व निवडणुकीच्या आधी झाल्या आहेत. माझ्या व्हिडिओद्वारे संभ्रम निर्माण केला जात आहे. माझे नाव घेतल्यास मी मानहानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पालिका सभागृह नेते सागर नाईक यांनी दिली.

Navi Mumbai News : डिजिटल जन्मदाखल्यांना दिरंगाई; विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा खोळंबा

Web Title: Shiv sena protest mercedes car contractor tender controversy house leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Navi Mumbai
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती  मुख्य कारणे?
1

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती मुख्य कारणे?

Maharashtra Breaking News Today 2026: पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता
2

Maharashtra Breaking News Today 2026: पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता

मतदारयादी शुद्धीकरणाचा भाजपलाच लाभ, २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल; खासदार धनंजय महाडिक यांचा दावा
3

मतदारयादी शुद्धीकरणाचा भाजपलाच लाभ, २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल; खासदार धनंजय महाडिक यांचा दावा

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार
4

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.