Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब! साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ; मेळाव्याआधीच संघटनेत भगदाड

Satara Political News : सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांनी दिलेल्या राजीनाम्याने केवळ एक पद रिकामे झाले नाही, तर शहरातील बूथ प्रमुखांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे संघटनाच हादरली आहे

  • By प्रीति माने
Updated On: Apr 19, 2026 | 01:03 PM
Shiv Sena Shinde group City Chief Nilesh More Resigns Satara Political News

Shiv Sena Shinde group City Chief Nilesh More Resigns Satara Political News

Follow Us
Follow Us:

Satara News : सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गांधी मैदानावर होणारा भव्य मेळावा अवघ्या तोंडावर आला असताना साताऱ्यात पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. शहरप्रमुख निलेश मोरे यांनी दिलेल्या राजीनाम्याने केवळ एक पद रिकामे झाले नाही, तर शहरातील बूथ प्रमुखांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे संघटनाच हादरली आहे.(Political News) या राजीनाम्याला “लेटर बॉम्ब” असेच संबोधावे लागेल, कारण त्यातून उघड झालेले आरोप थेट पक्षाच्या अंतर्गत कारभारावर बोट ठेवणारे आहेत.

शहरप्रमुख निलेश मोरे यांनी आपल्या राजीनामा पत्रातून संपर्कप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला आहे. “कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करायचे आणि श्रेय-निधी मात्र नातेवाईकांना?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विकास निधीच्या वाटपात झालेला कथित पक्षपात, नियोजन समितीतून ऐनवेळी नाव वगळणे, आणि सातत्याने डावलण्याचा आरोप या सगळ्यामुळे स्थानिक पातळीवरील असंतोष उघडपणे समोर आला आहे.

हे देखील वाचा : खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत; शिवाजीनगर भागातील धक्कादायक घटना

विशेष म्हणजे, हा बंडाचा सूर एखाद्या नाराज कार्यकर्त्याचा नसून कट्टर शिंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरे यांच्याकडून उमटला आहे. गोवा-गुवाहाटीच्या राजकीय घडामोडीनंतर पक्षाशी निष्ठा राखत, “शिवदूत”, “शासन आपल्या दारी”, “लाडकी बहीण” यांसारख्या योजनांपासून ते आरोग्य शिबिरे, वैद्यकीय मदत, अपंगांना बिल वाटप, धर्मवीर चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण अशी विविध कामे प्रामाणिकपणे राबविल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे.

साताऱ्यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद उभी करण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनाच जर दुय्यम वागणूक मिळत असेल, तर “निष्ठा ठेवून काय उपयोग?” असा जाहीर सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे. “आमची निष्ठा शिंदे साहेबांशी अखेरच्या श्वासापर्यंत आहे, पण पदावर काम करण्याची इच्छा उरलेली नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल; खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल

मोरे यांनी स्वतःचे संपर्क कार्यालय जिल्हा संपर्क कार्यालय म्हणून चालवले, स्वतःसह कुटुंबालाही पूर्णवेळ पक्षकार्यात झोकून दिले, तरीही वरिष्ठांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. “कार्यकर्त्यांना जपण्याची ताकद नसेल, तर पक्षात राहण्याचा अर्थ नाही,” हा त्यांचा रोखठोक इशारा पक्ष नेतृत्वासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. दरम्यान, शहरातील अनेक बूथ प्रमुखांनीही पदाचे राजीनामे दिल्याने हा असंतोष वैयक्तिक न राहता संघटनात्मक बंडात परिवर्तित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरच उघडकीस आलेला हा अंतर्गत संघर्ष शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

Web Title: Shiv sena shinde group city chief nilesh more resigns satara political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
2

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
3

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
4

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.