Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा! शिंदेंच्या ‘त्या’ शब्दांचा नेमका रोख कोणाकडे?

खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे पोस्टर समोर आले असून त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पोस्टरवर "जनात शिवसेना, मनात शिवसेना" असा संदेश देण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 18, 2026 | 07:45 PM
शिवसेनेच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा! शिंदेंच्या 'त्या' शब्दांचा नेमका रोख कोणाकडे? (Photo Credit- X)

शिवसेनेच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा! शिंदेंच्या 'त्या' शब्दांचा नेमका रोख कोणाकडे? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • शिवसेनेच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा!
  • शिंदेंच्या ‘त्या’ शब्दांचा नेमका रोख कोणाकडे?
  • वाचा संपूर्ण बातमी
मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षातील तब्बल सहा खासदारांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा रंगली आहे. हे सर्व खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. मात्र, आतापर्यंत या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाल्याचे दिसत नाही. दरम्यान, संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांविरोधात आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांना त्यांना मतदारसंघात विरोध करण्याचे आवाहन केले आहे.

शिंदे गटाच्या वर्धापनदिनाच्या पोस्टरची चर्चा

खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे पोस्टर समोर आले असून त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पोस्टरवर “जनात शिवसेना, मनात शिवसेना” असा संदेश देण्यात आला आहे. यामध्ये शिवसेनेचा डरकाळी फोडणारा सिंह, पक्षाचे निवडणूक चिन्ह तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्रे झळकवण्यात आली आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाषण करतानाचा फोटोही पोस्टरमध्ये दिसत आहे.

शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन! ‘जनात शिवसेना, मनात शिवसेना’ तुमच्या – आमच्या प्रत्येकाच्या नसांनसात भिनलेला विचार म्हणजे, ‘शिवसेना’!
येत्या १९ जून रोजी ‘शिवसेना’ या विचाराला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब… pic.twitter.com/KwnMsog5Yy
— Murji Patel (@MurjiPatel_) June 18, 2026

शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास! भुजबळांपासून सुरु झालेलं सत्र शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत कसं पोहोचलं? वाचा सविस्तर

वर्धापनदिन सोहळ्यात शिंदे काय बोलणार?

शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खासदारांच्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका मांडणार आणि आगामी राजकीय रणनीतीबाबत काय घोषणा करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

२० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

खासदार आणि आमदारांनंतर आता ठाकरे गटातील नगरसेवकांमध्येही प्रचंड अस्वस्थता असून, आगामी काळात पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा युवासेना नेते अमेय घोले यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे २० ते २५ नगरसेवक सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील, असे सांगत घोलेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

‘मातोश्री’वरून वेळ मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी नाराज

माध्यमांशी बोलताना अमेय घोले यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “ठाकरे गटात सध्या लोकप्रतिनिधींची गळचेपी होत आहे. पक्षातील खासदार आणि आमदारांना नेतृत्वाकडून भेटण्यासाठी पुरेसा वेळ आणि महत्त्व दिले जात नाही. याच मुख्य कारणास्तव लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी असून पक्षांतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे.”

‘संजय राऊत शिवीगाळ करत असतील तर…’ राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून किरेन रिजिजूंची मोठी प्रतिक्रिया

Web Title: Shiv senas new poster creates a massive buzz on social media at whom exactly are shindes words aimed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • shivsena
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
1

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
2

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
3

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
4

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.