
Eknath shinde
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठे विधान करत महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बंडखोरी करत बाहेर पडल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच, ‘मी जर धाडस केलं नसतं तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागं गेला असता,’ असं विधान त्यांनी यावेळी केलं. यामुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघामधील प्रचारार्थ केलेल्या भाषणात त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चिमटा काढला.
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती दौरा केला. अमरावती शिक्षक मतदारसंघातून लढत असलेले शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अमरावतीत दाखल झाले आहेत.
शिवसेनेतील बंडाचा उल्लेख यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला आपल्या निर्णयाचं समर्थन करत ते म्हणाले, ‘मी धाडस केलं नसतं, तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता.’ शिवसेनेतून वेगळी भूमिका घेतल्यानंतर राज्यातील सत्तासमीकरण बदलल्याची तसेच महाविकास आघाडीचं सरकार पडल्याची आठवण त्यांनी विरोधकांना करून दिली.
Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रीती रेवने यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. किरण सरनाईक यांच्या प्रचाराला पाठिंबा देत महायुती म्हणून ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिक्षकांच्या मागण्यांबाबत बोलताना शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं. ‘मी दिलेला शब्द पाळणारा आहे. एकदा कमिटमेंट दिली, तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो,’ असं ते म्हणाले.
शिक्षक हा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा घटक असल्याचं सांगत किरण सरनाईक शिक्षकांची कामं मार्गी लावतील आणि आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना शिंदे यांनी दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना इतर सवलतीही दिल्या जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं.
अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणूक सध्या चर्चेत आहे. महायुतीकडून किरण सरनाईक यांना उमेदवारी देण्यात आली असली, तरी शिवसेनेचे बंडखोर नेते श्रीकांत देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्याने मतदारसंघातील राजकीय समीकरणं महत्त्वाची ठरत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या सभेत शिक्षकांचे प्रश्न, जुनी पेन्शन, शेतकरी मदत आणि शिवसेनेतील बंड या मुद्द्यांवर भर देण्यात आला. आता या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Ans: महायुतीकडून शिवसेनेचे किरण सरनाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Ans: जुनी पेन्शन योजना आणि शिक्षकांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
Ans: शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांची लढत आणि पक्षीय समीकरणं चर्चेत आहेत.