Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kiran Sarnaik Election Campaign : सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार – एकनाथ शिंदे

Kiran Sarnaik Election Campaign : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 18, 2026 | 08:22 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • वचननामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज  
  • अध्यापन आणि विद्यार्थी घडविण्यावर लक्ष  
  • विजयाचा गुलाल उधळण्यासाठी अमरावतीत उपस्थित  
Kiran Sarnaik Election Campaign : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी केलेल्या कामाचा कार्यपूर्ती अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. काम केले असेल तरच कार्यपूर्ती अहवाल छापण्याची हिंमत होते. किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असून, शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

अमरावती येथे सरनाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अंबामातेचे दर्शन घेऊन आपण अमरावतीत आलो असल्याचे सांगत शिंदे यांनी उपस्थित मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार, महायुतीचे पदाधिकारी आणि शिक्षकांचे स्वागत केले.

वचननामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज

किरण सरनाईक यांनी मतदारसंघातील प्रत्येक शाळेला भेट देऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. यामुळे त्यांचा वचननामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून, केलेल्या कामाची एक कार्यपूर्ती अहवाल आणि पुढील कामांचा कृतीनिश्चय आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अध्यापन आणि विद्यार्थी घडविण्यावर लक्ष

जुन्या पेन्शनचा प्रलंबित प्रश्न असेल, दीर्घकाळ सेवा केलेल्या शिक्षकांशी संबंधित परीक्षा व सेवाशर्तींचे प्रश्न सरकार सकारात्मकतेने सोडवेल आहेत. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार न देता त्यांना अध्यापन आणि विद्यार्थी घडविण्यावर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. अल्पसंख्याक शाळा, आश्रमशाळा, दिव्यांग शाळा आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित प्रश्नांवरही सरकार काम करेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, दुष्काळ जाहीर करून शासनाच्या सवलतींचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. “सत्कार करण्याची वेळ नाही, बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे,” असे ते म्हणाले.

विरोधकांवर टीका करताना महायुती सरकार सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, महिला आणि शिक्षकांसाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचा आवाज सभागृहात प्रभावीपणे मांडण्यासाठी हक्काचा शिक्षक आमदार आवश्यक आहे. त्यामुळे २३ ऑक्टोबरला किरण सरनाईक यांना मतदान करून त्यांना विजयी करा, असे आवाहन शिंदे यांनी केले.

Washim: चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; व्यवस्थापनाचा आढावा 

विजयाचा गुलाल उधळण्यासाठी अमरावतीत उपस्थित

“दसऱ्याच्या सीमोल्लंघनापूर्वीच तुम्ही आज राजकीय सीमोल्लंघन केले आहे. दिवाळीपूर्वी सरनाईक यांच्या विजयाचे फटाके फोडायचे आहेत,” असे सांगत निकालाच्या दिवशी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपण अमरावतीत उपस्थित राहू, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

यावेळी आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, आमदार संजय कुटे आमदार किशोरआप्पा पाटील, युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार ॲड. प्रीती रेवणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे, शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख सुनील डीके, अमरावती शहरप्रमुख संतोष भदे, सह – संपर्कप्रमुख श्याम देशमुख आणि शिवसेनेचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sambhajinagar Crime News : पतीने पत्नीच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर खाजगी व्हिडिओ पाठवले; छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

Web Title: Eknath shinde supports kiran sarnaik amravati teachers constituency election sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Amravati City
  • Amravati Crime News
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘मी धाडस केलं नसतं तर…’ शिवसेना बंडखोरीची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला
1

Eknath Shinde : ‘मी धाडस केलं नसतं तर…’ शिवसेना बंडखोरीची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण
2

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?
3

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
4

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.