Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना वर्धापनदिन मेळाव्यात कोण गाजवणार व्यासपीठ? ठाकरे-शिंदे गटातील प्रमुख वक्त्यांची यादी समोर

शिवसेना वर्धापनदिन निमित्त ठाकरे आणि शिंदे गटाचे स्वतंत्र मेळावे होत आहेत. संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह शिंदे गटातून गुलाबराव पाटील, रामदास कदम आणि एकनाथ शिंदे भाषण करणार आहेत.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 19, 2026 | 07:47 PM
शिवसेना वर्धापनदिन मेळाव्यात कोण गाजवणार व्यासपीठ? ठाकरे-शिंदे गटातील प्रमुख वक्त्यांची यादी समोर

शिवसेना वर्धापनदिन मेळाव्यात कोण गाजवणार व्यासपीठ? ठाकरे-शिंदे गटातील प्रमुख वक्त्यांची यादी समोर

Follow Us
Follow Us:
  • शिवसेनेचा वर्धापनदिन मेळावा आज पार पडणार
  • षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंचा तर नेस्को सेंटरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा
  • खासदार फुटीनंतर दोन्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण (शिवसेना वर्धापनदिन) होत असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेली खळबळ, तर दुसरीकडे शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे मेळावे यामुळे सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट स्वतंत्रपणे वर्धापनदिन साजरा करणार असून दोन्ही बाजूंच्या प्रमुख वक्त्यांची यादी समोर आली आहे.

ठाकरे गटाचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन टायगर’नंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने या भाषणाकडे विशेष लक्ष लागले आहे.

ठाकरे गटातून हे नेते करणार भाषण

  • संजय राऊत
  • आदित्य ठाकरे
  • उद्धव ठाकरे
पक्षातील अलीकडील घडामोडी, खासदारांची बंडखोरी आणि आगामी राजकीय रणनीती यावर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे शिवसैनिकांसह राज्याचे लक्ष लागले आहे.

Ramadas Kadam: ‘६ नाही, ७ व्या खासदारानेही सही केलीये…’, रामदास कदमांचा सर्वात मोठा बॉम्ब, ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप!

शिंदे गटाचा मेळावा नेस्को सेंटरमध्ये

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापनदिन मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा शिंदे गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

शिंदे गटातून हे नेते करणार भाषण

  • गुलाबराव पाटील
  • ज्योती वाघमारे
  • रामदास कदम
  • एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला एकनाथ शिंदे कोणत्या शब्दांत प्रत्युत्तर देतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

खासदार फुटीनंतरची पहिली मोठी शक्तिप्रदर्शन सभा

ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चांनंतर दोन्ही गटांचा हा पहिलाच मोठा मेळावा आहे. त्यामुळे या व्यासपीठांवरून होणारे आरोप-प्रत्यारोप, पक्षसंघटनेवरील दावे आणि आगामी राजकीय दिशा याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Aaditya Thackeray: ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’; ६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी कडेकोट सुरक्षा

दरम्यान, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुमारे ३०० ते ४०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले असून प्रवेशद्वारांवर प्रत्येकाची तपासणी केली जात आहे.

तसेच काळ्या रंगाचे कपडे घालून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाकारला जात असल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दोन्ही भाषणांकडे राज्याचे लक्ष

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने होणारे हे दोन्ही मेळावे केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारे ठरू शकतात. विशेषतः खासदार फुटीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर कोणते राजकीय बाण सोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shivsena foundation day 2026 thackeray shinde rally speakers list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Ramadas Kadam: ‘६ नाही, ७ व्या खासदारानेही सही केलीये…’, रामदास कदमांचा सर्वात मोठा बॉम्ब, ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप!
1

Ramadas Kadam: ‘६ नाही, ७ व्या खासदारानेही सही केलीये…’, रामदास कदमांचा सर्वात मोठा बॉम्ब, ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप!

Aaditya Thackeray: ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’; ६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2

Aaditya Thackeray: ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’; ६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला
3

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
4

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.