Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramadas Kadam: ‘६ नाही, ७ व्या खासदारानेही सही केलीये…’, रामदास कदमांचा सर्वात मोठा बॉम्ब, ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप!

Ramdas Kadam On Opration Tiger: शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'सहा नाही, तर सातव्या खासदाराची देखील पत्रावर सही आहे, पण त्याला मंत्रिपदाचा शब्द हवा होता', असा दावा रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 19, 2026 | 06:30 PM
रामदास कदमांचा सर्वात मोठा बॉम्ब, ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप! (Photo Credit- X)

रामदास कदमांचा सर्वात मोठा बॉम्ब, ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटात पुन्हा महाभूकंप!
  • ६ नंतर आता सातवा खासदारही फुटला?
  • रामदास कदमांच्या विधानाने उडाली खळबळ
मुंबई: ठाकरे गटामधील ६ खासदार फुटल्यानंतर आता अजुन एक खासदार फुटल्याची बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सहा नाही, तर सातव्या खासदाराची देखील पत्रावर सही आहे, पण त्याला मंत्रिपदाचा शब्द हवा होता’, असा दावा रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. कदमांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

“उद्धवजी तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, ते तुम्हाला फसवत आहेत. सहा नाही, तर सातव्या खासदाराची देखील त्या पत्रावर सही आहे आणि तो खासदार आज तुमच्या बाजूला बसला आहे. तो सातवा खासदार मंत्रिपदाची मागणी करत होता. मला आधी मंत्रिपदाचा शब्द द्या, असं तो सातवा खासदार म्हणत होता. त्या सातव्या खासदाराने देखील त्या पत्रावर सही केलेली आहे. मात्र, तोच तुमच्या बाजूला आता बसत आहे. उद्धवजी हे तुम्हाला फसवत आहेत, हे लोक तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली – रामदास कदम

एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली, याचा अभिमान आम्हाला वाटतो. उद्धवजी, अजूनही वेळ गेली नाही. फक्त आदित्यसाठी पक्षाची वाट लावली आहे. त्याला आम्ही साहेब म्हणायचं. माझ्या चेंबरला आदित्य यायचे तेव्हा मी उठायचो, खुर्ची द्यायचो. मात्र मला काय माहिती होतं ते माझंच मंत्रीपद घेतील? मातोश्री आमचं मंदिर होतं, खूप वाईट वाटलं. ही आजची वेळ का यावी? का सगळे बाहेर पडलेत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला

६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया

ठाकरे सेनेच्या फुटेलेल्या ६ खासदाराविरुद्ध अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे धक्कादायक उदाहरण पाहत आहोत. हे निर्लज्ज, कृतघ्न आणि भ्रष्ट लोक जे काही विशिष्ट व्यक्तींमुळे २०२४ मध्ये निवडून आले तेच आता त्या लोकांना धोका देत आहेत! असे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल! असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

Web Title: After six mps has a seventh mp from the thackeray faction now rebelled a statement by ramdas kadam has caused a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics
  • Ramdas Kadam
  • shivsena
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
1

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
4

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.