Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला

Nitesh Rane on Aditya Thackeray: ऑपरेशन टायगरनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला असून त्यांची तुलना अभिषेक बॅनर्जींशी केली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी बंडखोर खासदारांना 'निर्लज्ज आणि विकले गेलेले' म्हणत तीव्र शब्दांत सुनावले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 19, 2026 | 03:26 PM
नितेश राणेंचा घणाघात, थेट 'हेल्मेट' गिफ्ट पाठवण्याचा टोला (Photo Credit- X)

नितेश राणेंचा घणाघात, थेट 'हेल्मेट' गिफ्ट पाठवण्याचा टोला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’
  • नितेश राणेंचा घणाघात
  • थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला
सिंधुदुर्ग: ऑपरेशन टायगर नंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. उद्धव ठाकरे गटातील ६ आमदारांचा शिंदे गटाने शांतीत कार्यक्रम केल्यानंतर आता सगळीकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तीव्र टीका होत आहे. आता भाजप नेते नितेश राणे यांनी कुठलीही संधी न सोडता ठाकरे सेनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले की, ज्याप्रमाणे अभिषेक बॅनर्जींमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला आणि फूट पडली, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. राणे यांनी म्हटले की, आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे गटाचे “अभिषेक बॅनर्जी” आहेत. त्यांनी टोमणा मारत पुढे सांगितले की, ज्याप्रमाणे अभिषेक बॅनर्जींना हेल्मेट घालून फिरावे लागते, तशीच भेट म्हणून ते आदित्य ठाकरेंनाही हेल्मेट पाठवत आहेत कारण कधी आणि कुठून चप्पल किंवा अंडे उडत येईल, याचा काही नेम नाही.

नितेश राणे यांचा दावा काय होता?

नितेश राणे यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी केलेल्या बंडाचे मुख्य कारण म्हणजे पक्ष नेतृत्वाचा काँग्रेसशी वाढलेला जवळीक. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती आणि ते पक्षाच्या विलीनीकरणाच्या दिशेनेही वाटचाल करत होते ही गोष्ट अनेक खासदारांना मान्य नव्हती.

घराणेशाहीच्या राजकारणावर भाष्य करायचं झालं, तर पक्ष बदलतात पण सूत्र तेच राहतात. जसं तृणमूलमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचं महत्त्व आहे, तसंच ‘उबाठा’मध्ये आदित्य ठाकरे यांचं.
आमदार @NiteshNRane हे नेहमीच अशा मुद्द्यांवर थेट आणि रोखठोक भूमिका मांडतात. म्हणूनच त्यांचे प्रश्न आणि प्रहार… pic.twitter.com/L2kihyE4pP
— मंगल 🇮🇳 (@Mangalkohale11) June 19, 2026

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

का केले ठाकरे गटाच्या नेत्यांनी बंड?

राणे यांनी सांगितले की, याच कारणामुळे खासदारांनी बंडाचा मार्ग निवडला. बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत त्यांनी नमूद केले की, बाळासाहेबांचे स्पष्ट मत होते, जर शिवसेनेने कधी काँग्रेसशी युती केली, तर ते “आपले दुकान बंद करतील.” राणे यांच्या मते, अनेक खासदारांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केले कारण ते बाळासाहेबांच्या याच विचारसरणीशी बांधील राहिले.

बंडखोर नेत्यांना आदित्य ठाकरे काय म्हणाले?

उबाठा नेते आदित्य ठाकरे म्हणाले, “पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे धक्कादायक उदाहरण पाहत आहोत. हे निर्लज्ज, कृतघ्न आणि भ्रष्ट लोक जे काही विशिष्ट व्यक्तींमुळे २०२४ मध्ये निवडून आले तेच आता त्या लोकांना धोका देत आहेत! तुम्ही कितीही कारणे दिलीत… तरी सत्य तेच राहते. तुम्ही निर्लज्जपणे स्वतःला विकले आहे. तुम्ही केवळ स्वतःलाच विकले नाही, तर तुमचा सन्मान, तुमची प्रतिष्ठा आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… अजिबात नाही!” या अंधारात प्रकाश आणण्याचे काम आपली ‘मशाल’च करेल!

Uddhav Thackeray: खासदार फुटीने बेजार पण अजूनही आशेचा किरण जिवंत…बाळासाहेबांचा फोटो अन्…उद्धव ठाकरेंची भावनिक पोस्ट

Web Title: Nitesh rane slams aditya thackeray calls him abhishek banerjee of ubt sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • BJP
  • Congress
  • Nitesh Rane
  • shivsena
  • ubt shiv sena

संबंधित बातम्या

PDCC Bank Election : पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ठरावांचा धुरळा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीही जोरदार फिल्डिंग
1

PDCC Bank Election : पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ठरावांचा धुरळा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीही जोरदार फिल्डिंग

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
2

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य
3

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
4

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.