Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या गळाला? शिवसेनेच्या बड्या नेत्यांशी घेतली भेट

राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त ताजे असतानाच आता ठाकरे गटाच्या आणखी एका बड्या नेत्याने शिवसेना खासदार उदय सामंत यांची भेट घेतली आहे.

  • By विवेक
Updated On: May 19, 2026 | 06:36 PM
Shivsena MP Bhausaheb Wakchaure meets Minister Uday Samant, Shivsena, Shivsena UBT, Eknath Shinde,

Shivsena MP Bhausaheb Wakchaure meets Minister Uday Samant, Shivsena, Shivsena UBT, Eknath Shinde,

Follow Us
Follow Us:
  • राज्याच्या राजकारणात आता पुन्हा मोठी खळबळ
  • ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उदय सामंत यांची घेतली भेट
  • भेटीमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात
राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त ताजे असतानाच आता ठाकरे गटाच्या आणखी एका बड्या नेत्याने शिवसेना खासदार उदय सामंत यांची भेट घेतली आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. या भेटीमुळे ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या ऑपरेशन टायगरची या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

एकीकडे शिवसेनेचे नेते ऑपरेशन टायगरबाबत चर्चा करताना दिसत आहेत. अश्यातच शिवसेना उबाठा पक्षाचे जवळपास सात खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. अश्यातच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे वृत्त ताजे होते. त्यानंतर आज (मंगळवार, १९ मे) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेले नसले तरीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

ऑपरेशन टायगर सक्रिय?

गेल्या काही काळापासून शिवसेना उबाठा पक्षाचे जवळपास सात खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सात खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत वक्तव्य करून असा कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याची माहिती याआधी दिली होती. तसेच ऑपरेशन टायगर सक्रिय नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या पक्षांतराच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला होता. नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या भेटीवरून याबाबत पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याने याबाबत आता राजकीय परिस्थिती पुन्हा मोठा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

“लोकांनी महागाईमुळे त्रास सहन करा किंवा जय श्रीराम म्हणा,” संजय राऊत यांची मोदी सरकारवर आगपाखड

ठाकरे गटाच्या सात खासदारांचा शिवसेनेत होणार प्रवेश ?

शिवसेना उबाठा पक्षाचे जवळपास सात खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सात खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली याबाबत मतदारसंघातील विकासकामे आणि निधीसाठी हि भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. आष्टीकरांच्या कार्यकर्त्यांकडून तसा दावा करण्यात येत आहे. परंतु या भेटीमागील नेमके कारण काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीमुळे ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. याआधीही संजय दीना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती परभणीचे आमदार संजय जाधव हेसुद्धा ठाकरे गटाला रामराम करून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

आरोग्य विभागाच्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

Web Title: Shivsena mp bhausaheb wakchaure meets minister uday samant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
1

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
2

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
4

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.