Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण असल्याच्या चर्चेवर रामदास कदम यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.

  • By विवेक
Updated On: Aug 22, 2026 | 04:01 PM
Ramdas Kafam

Ramdas Kafam

Follow Us
Follow Us:
  • ‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, असे म्हणत रामदास कदमांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
  • कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावरून उत्साहात असणाऱ्यांना कदमांनी ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे’ असा टोला लगावला.
  • राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून कदमांनी ‘गरिबी हटाव’च्या घोषणेचा संदर्भ देत काँग्रेसवर टीका केली.
 

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे, यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. आता शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद होणे बाकी आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर निशाणा साधला. पक्षाच्या मालकीबाबत वारसाहक्काचा मुद्दा लागू होत नसल्याचे त्यांनी म्हटले.

“वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही. वारसाहक्काने वडिलांची मालमत्ता मिळू शकते, मात्र पक्ष मिळत नसतो,” अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर अनेक बाबी अधिक स्पष्ट होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे’

कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर ठाकरे गटातील काही नेते उत्साही झाले असून, निकाल आपल्या बाजूने लागेल अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याबाबत कदमांना प्रश्न विचारण्यात आला.

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण

त्यावर त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. “काही लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे असतात. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,” असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरही टीका

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावरही रामदास कदम यांनी भाष्य केले. राहुल गांधी ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमात सहभागी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी काँग्रेसच्या जुन्या ‘गरिबी हटाव’ घोषणेचा उल्लेख केला.

गरिबी हटावचा नारा दिल्यानंतर तळागाळातील जनतेसाठी काँग्रेसने नेमके काय केले, असा सवाल त्यांनी राहुल गांधींना केला. काँग्रेस सत्तेत असताना हिंदू-मुस्लिम समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम झाल्याचा आरोपही कदम यांनी केला.

‘काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात’; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम केल्याने राजकीय यश मिळेल का, असा सवाल करत कदम यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ‘बालिश प्रयत्न’ असे संबोधले. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षनाव आणि चिन्हाच्या कायदेशीर लढाईसोबतच राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरूनही राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Web Title: Shivsena party symbol supreme court ramdas kadam reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Ramdas Kadam
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश
1

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
2

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा
3

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
4

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.