Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा

Shivsena Symbol Case : सुप्रीम कोर्टातील सुनावणीवरून शिवसेनेचे सहप्रवक्ते राजू वाघमारेंनी उबाठा गटावर जोरदार टीका केली. नीरज किशन कौल यांनी उबाठाच्या दाव्यांना कायद्याच्या आधारे उत्तर दिल्याचा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Oct 06, 2026 | 07:57 PM
Supreme Court Shiv Sena Hearing

Supreme Court Shiv Sena Hearing

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना ठाकरे गटाच्या दाव्यांना शिवसेनेचे वकील नीरज किशन कौल यांचे उत्तर
  • अपात्रतेचा खटला दाखल झाला म्हणजे आमदार लगेच अपात्र होत नाही, असा युक्तिवाद.
  • निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय, राजू वाघमारेंचा दावा
 

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज सुप्रीम कोर्टातील युक्तिवादावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. शिवसेनेचे सहप्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार निशाणा साधत ठाकरे गटाचे दावे कायद्याच्या कसोटीवर टिकले नसल्याचा दावा केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Shivsena Symbol Case)

सुप्रीम कोर्टात उबाठाच्या दाव्यांना शिवसेनेकडून उत्तर

निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानातील तरतुदींनुसारच निर्णय घेतल्याचे वाघमारे म्हणाले. अपात्रतेचा खटला प्रलंबित असताना निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देता येत नाही, हा ठाकरे गटाचा दावा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला देत हा मुद्दा शिवसेनेचे वकील नीरज किशन कौल यांनी खोडून काढल्याचे वाघमारे यांनी म्हटले. कलम ३२४ अंतर्गत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचा युक्तिवाद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अपात्रतेवरही शिवसेनेचा युक्तिवाद

आमदाराच्या अपात्रतेबाबतही शिवसेनेकडून महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आल्याचे वाघमारे म्हणाले. एखादा आमदार विधीमंडळातून अपात्र झाला तरी त्याचा परिणाम थेट राजकीय पक्षाच्या सदस्यत्वावर होतोच, असे नाही, असा मुद्दा मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

फक्त अपात्रतेचा खटला दाखल झाला म्हणून संबंधित आमदार अपात्र ठरत नाही. त्याची अपात्रता सिद्ध होणे आवश्यक आहे, असेही वाघमारे म्हणाले.

पक्ष आणि विधीमंडळ पक्ष वेगळे

दहाव्या अनुसूचीतील तरतुदींचा दाखला देत राजकीय पक्ष आणि विधीमंडळातील पक्ष यांच्यात फरक असल्याचे घटनापीठाने स्पष्ट केल्याचा दावा वाघमारेंनी केला. त्यामुळे दोन्ही बाबींना सरसकट एकच नियम लावता येणार नाही, असा युक्तिवाद शिवसेनेकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत घेतलेल्या निर्णयावरही वाघमारेंनी भाष्य केले. बहुमत आणि पक्षाची संघटनात्मक रचना लक्षात घेऊन आयोगाने निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

२०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेत बदल केले; मात्र ती सुधारित घटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली नसल्याचा आरोपही वाघमारेंनी केला. त्यामुळे आयोगाने पक्षाच्या घटनेऐवजी बहुमताचा आधार घेत शिवसेना आणि धनुष्यबाणाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

वाघमारेंनी याच मुद्द्यावरून ठाकरे गटावर आणखी टीका केली. पक्षांतर्गत लोकशाहीऐवजी सर्व अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रित करणारी रचना तयार करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील आजच्या युक्तिवादानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दाव्यांवर पुन्हा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Web Title: Shivsena symbol case supreme court shivsena ubt uddhav thackeray vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • election commission of india
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
1

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
2

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Supreme Court Hearing Gyanesh Kumar SIR Case: ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; निलंबनास नकार, केंद्राला नोटीस
4

Supreme Court Hearing Gyanesh Kumar SIR Case: ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; निलंबनास नकार, केंद्राला नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.