Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Politics: सोलापुरात राजकीय वातावरण तापले! ‘६०० मतदारांची अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी’; खा. धैर्यशील मोहिते-पाटलांचा दावा

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत मविआचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या पाठीशी ६०० मतदारांची अदृश्य शक्ती असल्याचा दावा खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 05, 2026 | 09:46 PM
Solapur Politics

Solapur Politics

Follow Us
Follow Us:

 

  • सोलापुरात राजकीय वातावरण तापले!
  • ‘६०० मतदारांची अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी’
  • खा. धैर्यशील मोहिते-पाटलांचा दावा
सोलापूर, शहर प्रतिनिधी: सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीमागे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वतोपरी पाठबळ असल्याचा दावा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला आहे. “आमच्याकडे १६ मतं आहेत का, असा प्रश्न विरोधक विचारत असतील तर मी १६ मतांपासून सुरुवात करतो. मात्र ६०० मतदारांची अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खा. मोहिते-पाटील म्हणाले की, पक्षप्रमुख शरद पवार यांच्या स्पष्ट आदेशानुसार वसंतराव देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. ही लढत केवळ एका उमेदवाराची नसून पुरोगामी विचारांची आहे. महाविकास आघाडी भाजपविरोधात एकसंघपणे मैदानात उतरली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केल्याचा उल्लेख करताना मोहिते-पाटील म्हणाले की, हे आवाहन आम्हाला केवळ माध्यमांतूनच समजले. प्रत्यक्षात कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही किंवा चर्चा केली नाही. संवाद झाला असता तर चित्र वेगळे असू शकले असते, असेही त्यांनी नमूद केले.

भाजपमधील नाराजी, जुने राजकीय ऋणानुबंध आणि मतांची गणिते; वसंत देशमुखांच्या श्रीपूर भेटीमागे नेमके काय?

लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी, ही हुकूमशाही नाही. आम्ही निवडणूक लढवायची नाही का? असा सवाल उपस्थित केला. पक्षांतर्गत मतभेद असतील तर ते घरच्या घरी सोडवले जातील. घरातील विषय चव्हाट्यावर मांडण्याची आमची परंपरा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वसंतराव देशमुख हे सुधाकरपंत परिचारक आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली घडलेले कार्यकर्ते असल्याचे सांगत, त्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले. आमच्यामागे महाविकास आघाडीतील कोणकोणत्या शक्ती आहेत, हे निकालाच्या दिवशी सर्वांना दिसेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.

पक्षाच्या आदेशानेच निवडणुकीच्या रिंगणात

महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख म्हणाले की, पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला असून उमेदवारी दाखल करण्याचे स्पष्ट आदेश मिळाले होते. काही भाजप नेत्यांकडून उमेदवारी मागे घेण्याबाबत संपर्क साधण्यात आला होता. मात्र पक्षाचा आदेश असल्याने उमेदवारी कायम ठेवली. उमेदवारी मागे घेण्याचा अधिकार केवळ वरिष्ठ नेत्यांकडे असून, निवडणुकीत सर्व पक्षांच्या मतदारांकडे मतांचा जोगवा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Solapur Municipal Corporation : पावसाळ्यापूर्वी सोलापूर मनपा अलर्ट; 74 नाल्यांसह नाला सफाई मोहिमेचा महापौरांनी घेतला आढावा

Web Title: Solapur mlc election mp dhairyasheel mohite patil claims support of 600 voters for vasantrao deshmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • MVA
  • Sharad Pawar
  • Solapur
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Sharad Pawar News: महागाईने सर्वसामान्य त्रस्त, अन् सरकार ठरवून इश्यू पुढे आणतंय!; शरद पवारांचा सनसनाटी आरोप
1

Sharad Pawar News: महागाईने सर्वसामान्य त्रस्त, अन् सरकार ठरवून इश्यू पुढे आणतंय!; शरद पवारांचा सनसनाटी आरोप

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?
2

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं
3

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं

Solapur : विद्यार्थ्यांनी घेतला पिठलं-भाकरीचा आंनद! पालकांच्या मार्गदर्शनाने उपक्रमाला उधाण
4

Solapur : विद्यार्थ्यांनी घेतला पिठलं-भाकरीचा आंनद! पालकांच्या मार्गदर्शनाने उपक्रमाला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.