Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत-जामखेडमध्ये राजकीय खळबळ! सभापती प्रा. राम शिंदे यांची राजेंद्र फाळके यांना सदिच्छा भेट

जेव्हा महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी अनपेक्षित भेट घेतली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 23, 2025 | 05:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण करणारी घटना शनिवारी घडली. महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी अनपेक्षित सदिच्छा भेट दिली. राजेंद्र फाळके यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयानंतर प्रा. शिंदे यांच्या अचानक भेटीने जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.\

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीचे गणित जातीय समीकरणावरच! ‘हा’ समुदायच ठरवणार बिहारचा पुढचा मुख्यमंत्री

गेल्या काही आठवड्यांत आमदार रोहित पवार यांचे अनेक सहकारी दूर गेले आहेत. नुकतीच दत्तात्रेय वारे यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्याने आधीच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत फाळके आणि शिंदे यांची झालेली ही भेट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे स्पष्ट नसले तरी राजकारणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर अनौपचारिक संवाद झाल्याचे सूत्रांकडून समजते. भेटीदरम्यान कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी आप्पा फाळके तसेच फाळके परिवारातील सदस्य उपस्थित होते. प्रा. शिंदे यांनी फाळके यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला.

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर; स्वबळावर लढू म्हणणारे जगताप आता म्हणतात, ‘हायकमांड ठरवेल…’ 

या सदिच्छा भेटीमुळे केवळ कर्जत-जामखेड मतदारसंघातच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्क-वितर्क सुरू असून, या भेटीचा भविष्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेते विरोधी राजकीय पथकातील असले तरी त्यांच्यात कधीही वैयक्तिक वाद किंवा आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत. त्यामुळेच या भेटीला राजकीय पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कर्जत-जामखेड परिसरात सध्या या घटनेचीच सर्वत्र चर्चा असून, या संवादातून भविष्यातील राजकीय हालचालींना दिशा मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Speaker prof ram shindes goodwill visit to rajendra phalke ncp sharad pawar gat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Politics
  • UBT

संबंधित बातम्या

Chhath Puja 2025:  ४८ लाखांहून अधिक मतदार निवडणुकीआधी सोडून जाणार बिहार; रोखण्यासाठी भाजपने केला मास्टरप्लॅन
1

Chhath Puja 2025: ४८ लाखांहून अधिक मतदार निवडणुकीआधी सोडून जाणार बिहार; रोखण्यासाठी भाजपने केला मास्टरप्लॅन

Bihar Assembly Election 2025: भाजपचे संकटमोचक अमित शांहाची मध्यस्थी अन् बंडखोरांची तलवार म्यान
2

Bihar Assembly Election 2025: भाजपचे संकटमोचक अमित शांहाची मध्यस्थी अन् बंडखोरांची तलवार म्यान

RSS वर बंदी घालण्याची मागणी अन् हायकोर्टाचा कर्नाटक सरकारला दणका; थेट खर्गेंच्या मतदारसंघातच…
3

RSS वर बंदी घालण्याची मागणी अन् हायकोर्टाचा कर्नाटक सरकारला दणका; थेट खर्गेंच्या मतदारसंघातच…

BJPकडून कश्मीरी पंडितांचा राजकीय वापर; भाजपच्याच नेत्याने पक्षाला दिला घरचा आहेर
4

BJPकडून कश्मीरी पंडितांचा राजकीय वापर; भाजपच्याच नेत्याने पक्षाला दिला घरचा आहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.