Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulapur Rave Party Case: रेव्ह पार्टीला हाऊस पार्टी ठरवण्याची घाई कुणाला वाचवण्यासाठी? सुषमा अंधारेंचा पुणे पोलिसांना सवाल

सुषमा अंधारे यांनी पुण्यातल्या तुळापूर येथील रेव्ह पार्टीवरून पुणे पोलीस प्रशासनाला चांगलेच घेरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळापूर येथील शिवसंस्कृती बंगल्यात ही रेव पार्टी सुरू होती.

  • By विवेक
Updated On: Jun 08, 2026 | 05:49 PM
Satara Doctor Death case Update :

Satara Doctor Death case Update :

Follow Us
Follow Us:

पुण्याजवळील तुळापूर येथे एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले असून तब्बल ७८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्टीत सुमारे १५६ जण सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राज्यभरातुन तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच पुणे पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अश्यातच आता राजकीय नेत्यांनाही याप्रकरणी सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांनी पुण्यातल्या तुळापूर येथील रेव्ह पार्टीवरून पुणे पोलीस प्रशासनाला चांगलेच घेरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळापूर येथील शिवसंस्कृती बंगल्यात ही रेव पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये अनेक तरुण-तरुणी मद्याच्या नशेत बेभान झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या पार्टीत जवळपास ४९ तरुणी सहभागी असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांना या ठिकाणी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट आढळून आले. यावरून सुषमा अंधारे यांनी आपल्या X अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे यांचा पुणे पोलिसांवर निशाणा

आपल्या X अकाऊंटवरून पोस्ट करत त्या म्हणाल्या, ‘छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र स्मृती स्थळ असलेल्या तुळापूर मध्ये तब्बल १५६ लोक ज्या पार्टीत सहभागी होतात त्याला शिताफीने हाऊस पार्टी ठरवण्याची घाई कुणाला वाचवण्यासाठी होतेय ? १५६ लोक सहभागी असताना फक्त ७८ लोकांवर गुन्हा दाखल का झाला त्यातही फक्त २९ लोकांची टेस्ट करण्यात आली असे का ?”

छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र स्मृती स्थळ असलेल्या तुळापूर मध्ये तब्बल 156 लोक ज्या पार्टीत सहभागी होतात त्याला शिताफीने हाऊस पार्टी ठरवण्याची घाई कुणाला वाचवण्यासाठी होतेय ?
154 लोक सहभागी असताना फक्त 78 लोकांवर गुन्हा दाखल का झाला त्यातही फक्त 29 लोकांची टेस्ट करण्यात आली… pic.twitter.com/aue5Z8oST4
— SushmaTai Andhare (@andharesushama) June 8, 2026

त्या पुढे म्हणाल्या, “पोलीस अधिकारी सातपुते तातडीने येऊन सांगत आहेत की एक्साईज डिपार्टमेंट ची परवानगी घेतलेली होती तो परवानगीचा कागद सार्वजनिक करण्याची मेहरबानी पोलीस प्रशासन करेल का ? १५४ सहभागी, त्यातील ७८ जणांवर गुन्हा आणि त्यातील फक्त २९ जणांची टेस्ट मग उर्वरित लोकांवर मेहरबानी कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली? सहभागी असणाऱ्यांचे राजकीय लागेबांधे आहेत की कुण्या उद्योगपतीशी संबंधित आहेत की आयटी क्षेत्रातील कोटीच्या घरात पॅकेज असणारे लोक आहेत… ? टीप देणाऱ्यांनीच प्रकरण मॅनेज तर केले नाही ना ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Tulapur Rave Party Case: पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो आहे का? तुळापूर रेव्ह पार्टीप्रकरणावरून रोहिणी खडसेंचा आक्रमक

पोलिसांच्या धाडीत काय सापडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत साडेनऊ लाख रुपयांच्या घरात आहे. काही विदेशी मद्याच्या बाटल्यांची किंमत ६५ ते ७० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, पार्टीमध्ये वापरण्यात येणारा सुमारे एक कोटी रुपयांचा डीजे सेटअपही पोलिसांना आढळून आला. घटनास्थळावरून सुमारे ४ ग्रॅम गांजाही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी २९ जणांची रक्त चाचणी केली असून, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधितांविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पार्टीत १५६ जण सहभागी असताना केवळ ७८ जणांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Pune Crime: तुळापूरच्या बंगल्यात रंगली हायप्रोफाईल रेव पार्टी; दारूच्या एका बॉटलची किंमत ६५ हजार! कोट्यवधींचा DJ आणि…

Web Title: Sushma andhare slams pune police over tulapur rave party case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Drugs Case
  • Drugs News
  • Pune Police
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
2

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना
3

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
4

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.