Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Marathi Language: परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्या निमंत्रण पत्रिकेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. पत्रिकेत मराठी भाषेला डावलण्यात आल्याचा आरोप होत असून, काही मान्यवरांच्या नावांमध्येही चुका असल्याचे समोर आले आहे. याशिवाय भाजपच्या पक्षीय प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 26, 2026 | 10:58 AM
परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Follow Us
Follow Us:
  • मराठीला डावलले, पक्षीय प्रोटोकॉलही मोडला
  • राजकुमार मिश्रा यांच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद
  • परिवहन सभापती वादाच्या भोवऱ्यात
विजय काते, मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. प्रशासकीय पदाशी संबंधित कार्यालयाच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका संपूर्णपणे हिंदी भाषेत छापण्यात आल्याने मराठी भाषेचा (Marathi Language) अवमान झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे “राजकुमार मिश्रा यांना मराठीचा विसर पडला आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी भाषेला प्राधान्य असणे अपेक्षित असताना, संबंधित पत्रिका पूर्णपणे हिंदी भाषेत असल्याने स्थानिक मराठी भाषिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

भाजपच्या पक्षीय प्रोटोकॉलवरही प्रश्नचिन्ह

या निमंत्रण पत्रिकेवरून केवळ भाषेचा मुद्दाच नव्हे, तर भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत प्रोटोकॉलबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे नाव निमंत्रण पत्रिकेत सर्वात खाली देण्यात आले असून, त्यापेक्षा लल्लन तिवारी यांचे नाव वरच्या क्रमांकावर छापण्यात आल्याचा आरोप आहे.पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नावांचा क्रम, त्यांचे पद आणि निमंत्रण पत्रिकेतील प्रोटोकॉल याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने भाजपच्या अंतर्गत शिस्तीचे पालन नेमके कोण करणार, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

स्थायी समिती सभापतींच्या नावाचीही चूक

याशिवाय भाजपचे स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत यांच्या नावातही निमंत्रण पत्रिकेत चूक झाल्याचे समोर आले आहे. ‘गहलोत’ऐवजी ‘महलोत’ असा उल्लेख करण्यात आल्याने निमंत्रण पत्रिका तयार करणाऱ्यांनी किमान नावांची पडताळणी तरी केली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका लोकप्रतिनिधीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत भाषेपासून ते पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या क्रमापर्यंत आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या स्पेलिंगपर्यंत चुका झाल्याने ही बाब राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.

“महापालिकेच्या कार्यक्रमात मराठीला स्थान नाही का?”

विरोधकांनी या संपूर्ण प्रकारावर आक्षेप घेत, महानगरपालिका प्रशासनाशी संबंधित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी भाषेला योग्य स्थान मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. स्थानिक नागरिकांच्या करातून चालणाऱ्या महापालिकेच्या कार्यक्रमात स्थानिक भाषेचा वापर करण्याऐवजी संपूर्ण पत्रिका हिंदीत काढणे हा मराठी भाषिक नागरिकांच्या भावनांचा अनादर असल्याची टीका केली जात आहे.दरम्यान, निमंत्रण पत्रिकेतील नावांचा क्रम, भाषेचा वापर आणि नावांमधील चुका याबाबत परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांची भूमिका काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाषेपासून पक्षीय प्रोटोकॉलपर्यंत अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या या निमंत्रण पत्रिकेमुळे उद्घाटन सोहळ्यापूर्वीच परिवहन सभापती राजकुमार मिश्रा अडचणीत आले आहेत.

मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतानांचा फोटो; दादा भुसे म्हणाले, ‘फोटो असेल तर काढायला लावणार’

Web Title: Transport chairman invitation card marathi language errors bjp protocol controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Marathi Language

संबंधित बातम्या

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
1

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
4

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.