Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Raut: विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ! सुनेच्या तक्रारीनंतर अटकेची टांगती तलवार; न्यायालयातून दिलासा नाही

माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारल्याने २३ जुलैपूर्वी राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 15, 2026 | 05:02 PM
विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ! सुनेच्या तक्रारीनंतर अटकेची टांगती तलवार (Photo Credit- X)

विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ! सुनेच्या तक्रारीनंतर अटकेची टांगती तलवार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ!
  • सुनेच्या तक्रारीनंतर अटकेची टांगती तलवार
  • न्यायालयातून दिलासा नाही
मुंबई: शिवसेना ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या कौटुंबिक वादाला आता मोठे कायदेशीर वळण लागले आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील एकूण ७ सदस्यांविरुद्ध पोलिसांत गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली असून, न्यायालयाने त्यांना तूर्तास कोणताही अंतरिम दिलासा दिलेला नाही.

२३ जुलैपर्यंत न्यायालयाचे संरक्षण नाही; पोलिसांकडून अटकेची शक्यता

या गंभीर गुन्ह्यानंतर विनायक राऊत यांनी कायदेशीर अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने या अर्जावर मुख्य सुनावणी होईपर्यंत राऊत यांना कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. या अर्जावर आता २३ जुलै रोजी मुख्य सुनावणी होणार आहे. परंतु, तोपर्यंत कोणतेही न्यायालयीन संरक्षण नसल्यामुळे पोलीस विनायक राऊत यांना चौकशीसाठी कधीही ताब्यात घेऊ शकतात.

अघोरी कृत्य आणि जादूटोणाचा गंभीर आरोप

गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीत अत्यंत धक्कादायक दावे केले आहेत. मूल होण्याच्या नावाखाली आपल्यावर तांत्रिक विधी, जबरदस्तीने औषधोपचार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचारासह जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अघोरी कृत्ये करणाऱ्या फिरोज शेख नावाच्या भोंदूबाबाला पोलिसांनी आधीच अटक केली आहे.

‘विनायक राऊत यांचं तोंड काळं झालं’; सुनेच्या आरोपांनंतर निलेश राणेंचा घणाघात; ‘अजून धक्कादायक गोष्टी समोर येतील,’ राणेंचा दावा

विनायक राऊतांनी सगळे आरोप फेटाळले

या सर्व खळबळजनक प्रकरणावर विनायक राऊत यांनी आपली बाजू मांडताना सुनेचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. राऊत म्हणाले, “माझा मुलगा गितैश आणि सून गिरीजा हे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत नाहीत. हा सर्व प्रकार २०१८ चा असल्याचे ती सांगत आहे, मग २०२६ मध्ये तक्रार का केली जात आहे? यातच सर्व काही काळेबेरे स्पष्ट होते.”

पैशांची आणि मालमत्तेची मागणी

विनायक राऊत यांनी दावा केला की, गिरीजा यांनी कायदेशीर नोटिशीमध्ये दरमहा ५ लाख रुपये खर्चाची मागणी केली होती. याशिवाय १० कोटी रुपयांची पोटगी, मानसिक त्रासापोटी २ कोटी रुपये, ५ रूमचे घर आणि ऑटोमॅटिक गाडी मागितली होती. या अवास्तव मागण्या पूर्ण न झाल्यानेच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार Vinayak Raut? ज्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्याच सुनेने लावलेत गंभीर आरोप!

Web Title: Trouble mounts for vinayak raut threat of arrest looms following daughter in laws complaint no relief from the court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • police
  • Shivsena UBT
  • thane
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
2

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ
4

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.