Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “सत्ताधारी पक्षातील कुठल्याही…”; ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचे मोठे विधान

सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहचली नाही. त्यामुळे शेतकरी टाहो फोडत आहेत, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2025 | 07:03 PM
Maharashtra Politics: “सत्ताधारी पक्षातील कुठल्याही…”; ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचे मोठे विधान
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली: महायुती मधले दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत ते फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. तेव्हा विचारासाठी नाही. कालच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना माहिती होतं की आपण एकत्र आलो नाही तर सत्ता येणार नाही. तसेच आर्थिक प्रलोभने देवून लोक फोडले नाहीत तर आपल्याला विजय मिळणार नाही. म्हणून कालच्या निवडणुकीमध्ये जरी त्यांनी विजय मिळवला असला तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याची ताकद नाही.

निवडणूक कशी लढवायची वरिष्ठ ठरवतील

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातील कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही. परंतु काही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी केल्यास कणकवली नगरपंचायतीमधील भष्टाचार रोखण्यासाठी लढा दिला जाईल, असा इशारा माजी आ. वैभव नाईक यांनी दिला. कणकवली येथील विजय भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बौलत होते. शहर विकास आघाडीबाबत उबाठाचे उमेदवार किवा कार्यकर्ते असतील त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या वरिष्ठांच्या कानावर घातल्या जातील त्यानंतर शहर
विकास आघाडीमध्ये जायचं की स्वतंत्र महाविकास आघाडीमधूनच निवडणूक लढवायची याचा विचार वरिष्ठ करतील.

महायुतीच्या चर्चेमध्ये खा. नारायण राणे यांना कोणी घेत नाही. नारायण राणे है या विभागाचे खासदार असताना त्यांना न विचारता विशाल परब यांना भाजपात घेतले तर शिंदे शिवसेनेमध्ये राजन तेली यांचा प्रवेश झाला. त्यामुळे राणेंच्या शब्दाला राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिलेली नाही, त्यामुळे महायुतीबाबत खा. राणेना विधान न केलेले बरे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच ठाकरेंचा पराभव? ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

आम्ही आमचे उमेदवार लवकर जाहीर करणार

उद्धव ठाकरे हे ५ ते ६ दिवस शेतकऱ्यांचे  दुःख पुसण्यासाठी दौरा करत आहेत. सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहचली नाही. त्यामुळे शेतकरी टाहो फोडत आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल याकडे राणेंनी बघितले पाहिजे. सत्ताधारांच्या विरोधात कस लढता येईल यासाठी आम्ही आमचे उमेदवार लवकर जाहिर करणार आहोत. तर या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनता असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

Election Ink: राज्यात पुन्हा ‘निळी शाई’चा रणसंग्राम! निवडणुकीतील ‘या’ खास शाईचा इतिहास आणि निर्मितीचे जाणून घ्या रहस्य!

पारकर यांनी निवडणूक लढवावी हा जनतेचा आग्रह

संदेश पारकर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राहीलेले आहेत.
त्यामुळे सर्वांचीच भूमिका आहे की, संदेश पारकर यांनी पुन्हा एकदा नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे रहावे.
या शहरामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे, तो दूर व्हावा ही लोकांची धारणा आहे.
लोकांनीं संदेश पारकर यांचे नाव सुचवले आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे.

Web Title: Ubt former mla vaibhav naik statement about no alliance with mahayuti for local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Local Body Elections 2025
  • Mahayuti
  • Sindhudurg
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते
1

Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते

Maharashtra Local Body Election Result: स्वतंत्र लढत, एकत्रित यश ; महायुतीची अंतर्गत संघर्षाची ‘ती’ स्ट्रॅटेजी यशस्वी
2

Maharashtra Local Body Election Result: स्वतंत्र लढत, एकत्रित यश ; महायुतीची अंतर्गत संघर्षाची ‘ती’ स्ट्रॅटेजी यशस्वी

रत्नागिरीच्या ‘या’ नगरपंचायतीसाठी अटीतटीची लढत; महायुतीला यश, आमदार सामंत ठरले किंगमेकर
3

रत्नागिरीच्या ‘या’ नगरपंचायतीसाठी अटीतटीची लढत; महायुतीला यश, आमदार सामंत ठरले किंगमेकर

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…
4

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ; महायुतीने तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.