Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा

महाविकास आघाडीतील इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत प्रवेश करायचा असेल, तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 'ऑपरेशन टायगर' राबवले जात असल्याच्या दाव्याला फेटाळून लावत त्यांनी नेते स्वतःहून शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 26, 2026 | 02:17 PM
Uday Samant

Uday Samant

Follow Us
Follow Us:
  • MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत
  • ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा
  • शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नेते येत आहेत
Uday Samant on Opertion Tiger : शिवसेनेच्या (UBT) नऊ खासदारांपैकी सहा जणांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 22 जून 2026 रोजी या खासदारांनी पक्षात प्रवेश केला. या सहा खासदारांमध्ये संजय हरिभाऊ जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय दीना पाटील, संजय देशमुख आणि नागेश अष्टिकर यांचा समावेश आहे. याचपार्श्वभूमूीवर आता महाविकास आघाडीतील आमदार आणि नेते स्वतःहून शिवसेनेत येण्यास इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागतच केले जाईल. मात्र, यासाठी कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ सुरू नसल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. विदर्भ दौऱ्यावर असताना अमरावती आणि नागपुरात आयोजित कार्यक्रमांदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

Operation Tiger : ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक

‘ऑपरेशन टायगर’वर भूमिका

उदय सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दररोज मुंबईत पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे त्याला ‘ऑपरेशन टायगर’ म्हणायचे झाल्यास त्याला ३६५ पर्यंत क्रमांक द्यावा लागेल. महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींना जर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारायचे असेल, तर आम्ही त्यांना का नाकारावे? मात्र कोणतेही विशेष ऑपरेशन सुरू नाही.”

विजय वडेट्टीवारांच्या प्रवेशाबाबत

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत विचारले असता सामंत म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे आमचे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी पक्षप्रवेशाबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. मात्र विदर्भाशी घट्ट नाळ जोडलेला आणि लोकांमध्ये लोकप्रिय नेता आमच्यासोबत आला, तर त्याचा आनंदच होईल.”

संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर दिलगिरी

संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, त्यांच्या वक्तव्याचे पक्षाने कुठेही समर्थन केलेले नाही. त्यांनी त्याबद्दल माफी मागितली असून भविष्यात अशी भूमिका पुन्हा घेणार नाहीत, अशी चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत केली आहे. “त्यांच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो,” असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

राम मंदिर आणि संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया

अयोध्या राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेल्या चांदीच्या विटीबाबत संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, “या प्रकरणी उत्तर प्रदेशात एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. काही गैरप्रकार झाला असेल, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र महाराष्ट्रातून या विषयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”

डेटा सेंटर धोरणावरही भाष्य

राज्यातील डेटा सेंटर उभारणीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, २०२६ च्या ग्रीन डेटा सेंटर पॉलिसीमध्ये पाणी पुनर्वापरासह विविध पर्यावरणीय बाबींचा समावेश करण्यात आला आहे. एमएमआर परिसरातील डेटा सेंटरसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अमेझॉन आणि ब्लॅकस्टोनसारख्या कंपन्या हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याची माहिती त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत

उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याबाबत विचारले असता, “त्यांना माझ्या शुभेच्छा,” असे सांगत सामंत यांनी अधिक भाष्य टाळले. दरम्यान, राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असतानाच उदय सामंत यांनी कोणतेही ऑपरेशन नसल्याचा दावा करत महाविकास आघाडीतील इच्छुक नेत्यांसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट केले आहे.

Shrikant Shinde : ‘ऑपरेशन टायगर’चे मास्टरमाइंड डॉ. श्रीकांत शिंदे? उबाठाला खिंडार पाडण्यात रणनीती ठरली निर्णायक

Web Title: Uday samant rejects operation tiger claim welcomes mlas from mahavikas aghadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Operation Tiger
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार
1

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन
2

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
4

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.