Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray: खासदार फुटीने बेजार पण अजूनही आशेचा किरण जिवंत…बाळासाहेबांचा फोटो अन्…उद्धव ठाकरेंची भावनिक पोस्ट

Uddhav Thackeray News: 'ऑपरेशन टायगर'मुळे शिवसेना ठाकरे गटात मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू असतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त इन्स्टाग्रामवर एक सूचक आणि काव्यमय पोस्ट शेअर केली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत,उद्धव ठाकरेंनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 19, 2026 | 12:31 PM
खासदार फुटीने बेजार पण अजूनही आशेचा किरण जिवंत...बाळासाहेबांचा फोटो अन्...उद्धव ठाकरेंची भावनिक पोस्ट

खासदार फुटीने बेजार पण अजूनही आशेचा किरण जिवंत...बाळासाहेबांचा फोटो अन्...उद्धव ठाकरेंची भावनिक पोस्ट

Follow Us
Follow Us:
  • ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेत उद्धव ठाकरेंची सूचक पोस्ट
  • बाळासाहेबांच्या फोटोसह दिला संघर्षाचा संदेश
  • शिवसेना वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची काव्यमय पोस्ट चर्चेत
Uddhav Thackeray News Marathi : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील (उबाठा) सहा खासदार फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. खासदारांचा गट फोडण्यासाठी आखलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा शिंदे सेनेतील काही नेत्यांकडून केला जात आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नऊ पैकी केवळ तीनच खासदार उपस्थित होते. तर दुसरीकडे आज (19 जानेवारी 2026) शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगत असताना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात असतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक सूचक आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. खासदारांच्या कथित फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचा आज वर्धापन दिन; शिंदेंच्या शिवसेनेत उत्साह तर ठाकरे गटात अस्वस्थता

शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक छायाचित्र पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्यांनी, “किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी” या काव्यात्मक ओळी लिहिल्या आहेत.

या ओळींमधून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केल्याची चर्चा सुरू आहे. पक्षासमोर निर्माण झालेली आव्हाने, पक्षांतर्गत घडामोडी आणि राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणातही संघर्षाच्या जोरावर पुन्हा उज्ज्वल दिवस येतील, असा आशावादी संदेश त्यांनी शिवसैनिकांना दिल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, ‘ऑपरेशन टायगर‘च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही नेत्यांच्या भूमिकांबाबत विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया न देता संयमाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यांच्या या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये नव्या उमेदीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून अनेक राजकीय चढ-उतारांचा सामना करणाऱ्या पक्षासाठी हा वर्धापन दिन विशेष ठरला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि संघर्षाच्या परंपरेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी संकट कितीही मोठे असले, तरी अंधारानंतर प्रकाशाचा काळ येतो, हा संदेश पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

Operation Tiger: संजय राऊतांच्या ‘ऑपरेशन तुडवा’ इशाऱ्यानंतर बंडखोर खासदारांना Y+ सुरक्षा; गृह विभागाचा मोठा निर्णय

Web Title: Uddhav thackeray cryptic instagram post on shiv sena anniversary amid operation tiger discussions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • Operation Tiger
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
1

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर
2

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर

Eknath Shinde : लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमली ब्रिटिश संसद
3

Eknath Shinde : लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमली ब्रिटिश संसद

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका
4

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.