Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून नागपूरला एकाच विमानातून प्रवास केल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 26, 2026 | 08:44 PM
राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-नागपूर एकाच इंडिगो विमानातून प्रवास
  • विमानात भेट होताच दोन्ही नेत्यांची हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस
  • ही भेट केवळ योगायोग, राजकीय अर्थ काढू नये; दोन्ही पक्षांकडून स्पष्टीकरण
 

राज्यात शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना शनिवारी आणखी एक महत्त्वाची घटना घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून नागपूरला एकाच इंडिगो विमानातून प्रवास केला. विमानात भेट होताच दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि एकमेकांची विचारपूस केली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे इतर नेतेही उपस्थित होते. नागपूरला रवाना होताना विमानात झालेली ही भेट अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली.

फडणवीसांची प्रतिक्रिया; ‘आम्ही तिघे भेटलो, हीच मोठी बातमी’

विमानप्रवासानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलक्याफुलक्या शब्दांत, “आम्ही तिघे भेटलो, हीच मोठी बातमी आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला. दरम्यान, उद्धव ठाकरे हे पक्ष सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यासाठी विदर्भाकडे रवाना झाले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसही अधिकृत कार्यक्रमासाठी नागपूरला जात होते.

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

दोन्ही पक्षांकडून ‘योगायोग’ असल्याचे स्पष्टीकरण

या विमानप्रवासाला राजकीय रंग दिला जात असतानाच भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही बाजूंकडून स्पष्टीकरण देण्यात आले. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही भेट पूर्णपणे योगायोग असल्याचे सांगितले. दोन्ही नेते आपापल्या नियोजित कार्यक्रमासाठी नागपूरला जात होते आणि या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकच विमानाने प्रवेश… pic.twitter.com/ySNBRaEoII — Padmesh Pawar || पदमेश पवार (@PawarPadmesh) June 26, 2026

याबाबत बोलताना सुषमा अंधारे आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून म्हणाल्या, “ठाकरे फडणवीस यांनी एकत्र मुंबई ते नागपूर विमान प्रवास केल्याने चर्चांना उधाण येण्याचे काहीही कारण नाही. नागपूर हे मुख्यमंत्र्यांचे होम ग्राउंड आहे तर उद्धव साहेबांचा आजपासून चा दौरा नियोजित आहे. इंधन बचतीच्या संदर्भाने पंतप्रधानांपासून सगळेच जण बोलत आहेत त्यामुळे नेते खाजगी विमानाने प्रवास करायचे टाळत असतील तर तर या मागचे कारण निव्वळ राष्ट्रहित आहे..!”

‘फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील’; ‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांचा पलटवार

मात्र, अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या विमानप्रवासाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणते घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Web Title: Uddhav thackeray devendra fadnavis same flight nagpur political buzz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadnavis
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
3

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.