Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“या, परत या… शिवसेना आपलीच”; खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भावनिक साद

हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका करत नाराज शिवसैनिकांना ‘परत या, शिवसेना आपलीच’ अशी भावनिक साद घातली. डिलिमिटेशन आणि संविधानाच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर निशाणा.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 07:30 PM
“या, परत या... शिवसेना आपलीच”; खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“या, परत या... शिवसेना आपलीच”; खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भावनिक साद

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरे यांची हिंगोलीतील सभेत बंडखोर खासदारांवर जोरदार टीका 
  • नाराज आणि पक्षापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना “परत या” अशी भावनिक साद 
  • डिलिमिटेशन, संविधान आणि लोकशाहीच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. हिंगोलीतील सभेत बोलताना त्यांनी बंडखोर खासदारांवर तीव्र टीका करत कार्यकर्त्यांना नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

ठाकरे म्हणाले की, दोन तृतियांश बहुमत मिळवून संविधानात बदल करण्यासाठी आणि डिलिमिटेशनच्या माध्यमातून लोकशाहीची ताकद कमी करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेने आणि विरोधी पक्षांनी याला रोखण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“डिलिमिटेशननंतर तुमच्या मताची किंमत कमी होईल”

सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. भविष्यात मतदारसंघ पुनर्रचनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो आणि सामान्य मतदाराच्या मताची ताकद कमी होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. त्यांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन करत लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात 

“मला शिवसेनेची सत्ता हवी, कारण न्याय द्यायचा आहे”

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरही भाष्य केले. ठाण्यातील कथित पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारांचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. अशा घटनांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “मला शिवसेनेची सत्ता पाहिजे, कारण मला न्याय द्यायचा आहे. मला शिवसेनेचा खासदार पाहिजे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा संघटित होण्याचे आवाहन केले.

“नाराज झालेले सर्वजण परत या”

सभेतील सर्वात भावनिक क्षणी उद्धव ठाकरे यांनी पक्षातून दूर गेलेल्या आणि नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना थेट साद घातली. “जे कोणी नाराज होऊन दुसरीकडे गेले असतील, त्यांनी परत यावे. शिवसेना आपलीच आहे. गद्दारांमुळे कोणी दूर गेले असेल तर पुन्हा पक्षात या,” असे आवाहन त्यांनी केले.

तसेच निष्ठावंत शिवसैनिकांनी एकत्र येऊन पक्ष मजबूत करावा आणि बंडखोरांना लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, वाशिममधून ‘या’ शिवसैनिकाला मिळणार खासदारकीची उमेदवारी

Web Title: Uddhav thackeray emotional appeal to shiv sainiks after mp rebellion hingoli rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Hingoli
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
1

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
2

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
3

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
4

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.