Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा

परभणीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तीव्र टीका करत 'भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी' असे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी बंडखोर खासदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबतही मोठे दावे केले.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 04:36 PM
'भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी'; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा

'भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी'; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा

Follow Us
Follow Us:
  • परभणीतील सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपला ‘बाबर जनता पार्टी’ अशी टीका केली.
  • बंडखोर खासदारांवर निशाणा साधत ‘माझीही चूक झाली, मी माफी मागतो’ असे वक्तव्य केले.
  • देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या राजकीय भवितव्यावरही मोठे दावे केले.
 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे आयोजित जाहीर सभेत भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. बंडखोर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघातील या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर हिंदुत्व, राम मंदिर आणि सत्तेच्या राजकारणावरून निशाणा साधला.

शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या या सहा खासदारांच्या मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे मेळावे घेत असून स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज (रविवार, 28 जून) परभणी येथे आयोजित जाजोदिर सभेत त्यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर कडाडून टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

यावेळी, राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्हाला मंदिर बांधायचं नव्हतं, रामाच्या नावाने लूट करायची होती. जगातील तमाम हिंदूंशी गद्दारी झाली आहे. भाजप नव्हे, ही बाबर जनता पार्टी आहे. बाबरांनी मंदिर पाडलं, हे मंदिर लुटत आहेत.” तसेच बंडखोर खासदारांनी अशा पक्षाला पाठिंबा का दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘माझीही चूक झाली, मी माफी मागतो’

बंडखोर खासदारांच्या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर आत्मपरीक्षणही केले. “तुम्ही त्यांना निवडून दिलं, माझीही चूक झाली. एवढी वर्षे सोबत राहिल्यावर विश्वास ठेवायचा नाही का? मी माफी मागतो,” असे म्हणत त्यांनी शिवसैनिकांना गद्दारांविरोधात एकजूट राहण्याचे आवाहन केले.

फडणवीस आणि गडकरींबाबतही मोठा दावा

सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबतही मोठा दावा केला. त्यांच्या मते, भाजपमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येणाऱ्या नेत्यांचे राजकीय पंख छाटले जातात.

ते म्हणाले, “शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत जे झालं, तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही सुरू आहे. त्यांच्या राजकीय पंख कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच विमानातील भेटीत ते हतबल वाटत होते.”

गडकरींचाही उल्लेख करत साधला निशाणा

नितीन गडकरी यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “गडकरी पक्षाध्यक्ष होते. पुन्हा अध्यक्ष झाले असते तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आले असते. म्हणून त्यांचेही पंख छाटण्यात आले. आता त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला.”

Web Title: Uddhav thackeray slams bjp calls it babar janata party parbhani speech

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Parbhani
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
1

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
2

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
3

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
4

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.