Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला?’; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार

शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. "मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला?" असा सवाल करत त्यांनी बंडखोर खासदारांवर हल्लाबोल केला.

  • By विवेक
Updated On: Jun 19, 2026 | 09:34 PM
'मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला?'; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार

'मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला?'; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार

Follow Us
Follow Us:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापनदिन मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः धाराशिवचे खासदार ओमराजे  निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले.

निंबाळकरांच्या वक्तव्यावरून ठाकरेंचा संताप

ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे प्रचारासाठी फिरत नसल्याची टीका केली होती. “उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे प्रचारासाठी येत नाहीत, पण निदान आदित्य ठाकरे तरी मतदारसंघात फिरायला हवेत,” असे निंबाळकर यांनी म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिन मेळाव्यातून त्यांना प्रत्युत्तर दिले.

मी भेटत नव्हतो तर निवडून कसा आलास?

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे भेटत नाहीत, आदित्य फिरत नाहीत असं म्हणतात. मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला? प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मी सहा ते दहा सभा घेतल्या, तेव्हा तुम्ही निवडून आलात.” ते पुढे म्हणाले, “मी मंत्री केलं, आमदार केलं, खुर्ची दाखवली. हा माझा गर्व असेल, पण मी तो गर्व दाखवणार नाही.”

Shivsena : ‘जमलेल्या माझ्या तमाम..,’ उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचा शिवसेना वर्धापन दिन मेळावा

उद्धव ठाकरेंना नाही, बाळासाहेबांच्या नावाला मतं मिळाली

बंडखोर खासदारांवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, काहींना वाटतं लोकांनी त्यांना वैयक्तिक मत दिलं. “उद्धव ठाकरेंना किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेंना किंमत आहे,” असे ते म्हणाले.

आपली भूमिका स्पष्ट करताना ठाकरे यांनी वडाच्या झाडाचे उदाहरण दिले. “वड मोठा असतो. एखादा लांबून नमस्कार करतो. पारंबीला वाटतं नमस्कार मलाच केला. पण तो पारंबीला नाही, तर खोडाला केलेला असतो,” असे म्हणत त्यांनी बंडखोर खासदारांवर अप्रत्यक्ष टीका केली.

‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे…’, बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान; तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

मातोश्रीवर शिंतोडे उडवले जात आहेत

ठाकरे यांनी बंडखोरांवर भावनिक शब्दांतही हल्ला चढवला. “मातोश्रीवर शिंतोडे उडवले जात आहेत. ही कोणती अवलाद आहे? शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमान पेरला, मग ही भेसळ कुठून आली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर आयोजित झालेल्या या पहिल्याच मोठ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. बंडखोर खासदार, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत त्यांनी शिवसैनिकांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. वर्धापनदिनाच्या व्यासपीठावरून दिलेल्या या भाषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Uddhav thackeray slams omraje nimbalkar shivsena foundation day rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Mp Omraje Nimbalkar
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
1

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
2

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
3

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
4

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.