बंडखोर खासदारांवर एकनाथ शिंदेचं सूचक विधान; तर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल (Photo Credit- X)
LIVE । गोरेगांव, मुंबई संस्कार हिंदुत्वाचा, वसा समाजकल्याणाचा ! ‘शिवसेनेचा ६०वा वर्धापन दिन सोहळा’ – लाईव्ह https://t.co/T34QfVvZcv — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 19, 2026
उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील (MVA) सहभागावर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर एकनाथ शिंदेनी भूतकाळातील दाखले देत गंभीर आरोप केले. शिंदे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना तुम्ही त्यांना किती त्रास दिला, हे आम्हा सर्वांना माहित आहे. बाळासाहेब गेल्यानंतर ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्यांना आयुष्यभर तिरस्कार होता, त्याच लोकांचा तुम्ही सत्तेसाठी पुरस्कार केला. इतिहास साक्षी आहे, शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसने आणि दुसऱ्यांदा काँग्रेसने फोडली. हेच लोक आज उद्धव ठाकरेंना पुढे करून राजकारण करत आहेत. ज्या एकनाथ शिंदेने शिवसेनेचा भगवा या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विळख्यातून मुक्त केला, त्याच्यावरच हे लोक टीका करत आहेत.”
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यामधील अंतर्गत संबंधांवरून अफवा पसरवणाऱ्या विरोधकांना मिश्कील टोमणा मारला. शिंदे म्हणाले, “आमच्या महायुतीत आणि विशेषतः देवेंद्रजी आणि माझ्यामध्ये खोडा घालण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहेत. मात्र, आम्ही सत्तेच्या किंवा खुर्चीच्या मोहासाठी एकत्र आलेलो नाही, तर एका ठाम विचारसरणीसाठी एकत्र आलो आहोत.” ते म्हणाले, “कुछ लोग छुप-छुप कर उन्हे बताते है, वो सब आकर हमें बताते है…”.






