Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे, सूर्यावर थुंकण्यासारखं…; ‘त्या’ टीकेवरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक

शिवसेना ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला होता. आता मुख्य प्रवक्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2025 | 04:54 PM
Vanchit Bahujan Aghadi strong response to criticism by shivsena Thackeray group

Vanchit Bahujan Aghadi strong response to criticism by shivsena Thackeray group

Follow Us
Follow Us:

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून राज्यातील राजकारण्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येतो. काल (दि. 14 एप्रिल) रोजी एक राजकीय अग्रलेख प्रकाशित करण्यात आले होते. या अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाला खडेबोल सुनावले आहेत. प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्यापूर्वी शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीने प्रत्युत्तर दिले आहे.

सामनामधून केलेल्या टीकेला वंचित बहुजन आघाडीने तीव्र प्रतिवाद केला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या टीकेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय लढ्यांचे उदाहरण देत शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचा सर्व इतिहास सांगत हल्लाबोल केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे मत स्पष्ट केले. ते म्हणाले की, “फुले चित्रपटावर ब्राह्मण संघटनांकडून विरोध झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होते ज्यांनी या चित्रपटाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला विरोध करत चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांच्या कापणीविरोधात ठाम भूमिका घेतली. या संघर्षात महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष सहभागी झाला नव्हता,” असे मत पक्षाच्या प्रवक्त्यांनी मांडले आहे.

गोध्रा हत्याकांडाच्या वेळी भाजपच्या पाठीशी

सिद्धार्थ मोकळे यांनी शिवसेनेच्या इतिहासावर प्रकाश टाकत हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “शिवसेना 25 वर्षे भाजपसोबत युतीत होती आणि गोध्रा हत्याकांडाच्या वेळी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी राहिली होती. अशा पक्षाने बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यावर टीका करणे हे हास्यास्पद आहे. त्यांनी शिवसेनेला स्वतःचा राजकीय इतिहास तपासण्याचा सल्ला दिला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले, “बाळासाहेब आंबेडकर हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन, राजकीय आणि सामाजिक स्तरावर लढा देत आहेत. संध्याकाळी सहानंतर झालेल्या मतदानाच्या विरोधात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्रात सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्येविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून आणि न्यायालयात महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या विरोधात लढा दिला आहे. तसेच, बिहार मधील महायुती सरकारच्या विरोधात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा यासाठीही त्यांनी लढा दिला आहे,” असे मत सिद्धार्थ मोकळे यांनी व्यक्त केले.

त्यांच्यावरील टीका सूर्यावर थुंकण्यासारखी

वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, “बाळासाहेब आंबेडकर हे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेते आहेत. त्यांच्यावर कितीही टीका केली गेली तरी ती सूर्यावर थुंकण्यासारखी आहे. त्यामुळे स्वतःचे चेहरे रंगवून घेणे आता थांबवा. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी शिवसेना ठाकरे गटाला केले आहे.

 

Web Title: Vanchit bahujan aghadi strong response to criticism by shivsena thackeray group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • sanjay raut
  • shivsena
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
2

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
3

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
4

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.