'या' कारणांमुळे बाद होत आहेत लाडक्या बहिणींचे अर्ज; तुम्हीही निकष पूर्ण केलेत का? (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महायुतीच्या अनेक योजनांपैकी सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेंतर्गत महिलांना दर महा 1500 रुपये दिले जात आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या मित्रपक्षानी योजना जोरदार प्रचार केला. तसेच 2100 रुपये देण्याचे आश्वासन देखील दिले. मात्र महायुतीचे पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर हे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. तसेच आता राज्यातील 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपये देण्यात येणार आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधारी नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
विरोधकांनी ही योजना म्हणजे केवळ निवडणूक जिंकण्याचा जुमला असून निवडणुकीमध्ये याने मतं विकत घेतली असा आरोप केला जात आहे. यावर आता राज्यातील इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून डावलण्यात आले आहे. नमो किसान महासन्मान निधी मिळणाऱ्या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपये दिले जाणार आहेत. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. योजनेचे पैसे आता शून्य होतील अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. विरोधकांच्या या आरोपांना सत्ताधारी नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लाडक्या बहिणींना आता केवळ 500 रुपये मिळणार याबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना माध्यमांनी प्रश्न केला. ते म्हणाले की, ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा केली जाईल, तेव्हा ही बाब वेबसाईटवर जाहीर केली जाईल. मूळ जीआरमध्ये ज्या गोष्टी नमूद होत्या, त्या बाबी अनुसरून सर्व पात्र महिलांना या योजनेतील पैसे मिळतील. ही योजना यापुढेही सुरू राहील.” असे मत आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीने निवडणुकीच्या काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल माध्यमांनी विचारला. याबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, “महाराष्ट्र सरकारच्या महसुलात वाढ झाल्यावर त्याचं योग्य नियोजन करण्याकरता विविध विभागांना त्या निधीचं वितरण केलं जातं. त्यामुळे ज्या दिवशी महसूल वाढेल तेव्हा सर्व नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजनातील पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्याने सरकार दिलेल्या वचनांची पूर्तता करेल.” असे स्पष्ट मत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये सुद्धा आणि 500 रुपये किंवा 5 लाख रुपये सुद्धा किंमत असू शकत नाही. माझ्या लाडक्या बहिणींची पैशांमध्ये किंमत होऊ शकत नाही. जे 1500 रुपये महिलांना दिले. ते फुल नाही फुलाची पाकळी म्हणून भाऊबीज आणि रक्षाबंधनला दिले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने ही योजना जाहीर केली. या योजनेचे मोल पैशांमध्ये होऊ शकत नाही. याबाबत राज्य सरकार अद्याप अधिकृत भूमिका घेतलेली नाही,” असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.