Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरॊप त्यांनी केले.

  • By विवेक
Updated On: Jun 02, 2026 | 05:00 PM
'विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?'; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल

'विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?'; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून चर्चा सुरु आहेत. राज्य सरकारने राज्यातील ८० लाख महिला या योजनेस अपात्र असल्याचे ठरवत त्यांचे नाव योजनेतून काढून टाकले आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. यावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरॊप त्यांनी केले असून त्यांच्या या आरोपांनी आता राज्यात खळबळ उडाली आहे.

राज्यात मोठ्या गाजावाजासह सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या गेमचेंजर ठरली होती. मात्र आता या योजनेतील तब्बल ८१ लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. बँक पडताळणी, ई-केवायसी मोहीम आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या माहितीची काटेकोर छाननी केल्यानंतर महिला व बालविकास विभागाने ही मोठी कपात केली आहे. या धडक कारवाईमुळे सुरुवातीला मोठ्या संख्येने लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी देखील राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्या यावेळी म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? मुख्यमंत्री महोदय, लाडकी बहीण योजनेतून आज ८० लाख महिला अपात्र होत असतील तर, त्याला जबाबदार असलेल्या यंत्रणेवर आणि यामाध्यमातून राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे! अन्यथा ही योजना म्हणजे निवडणुकीपूर्वी वाटलेली लाच म्हणावी लागेल.”

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? मुख्यमंत्री महोदय, लाडकी बहीण योजनेतून आज ८० लाख महिला अपात्र होत असतील तर, त्याला जबाबदार असलेल्या यंत्रणेवर आणि यामाध्यमातून राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे! अन्यथा ही योजना म्हणजे… pic.twitter.com/wd5bK1ALhO — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 2, 2026

त्या पुढे म्हणाल्या, “सरकारने गेल्या २० महिन्यांत ८० लाख अपात्र महिलांना १५०० रुपये दिले. या हिशोबाने २४ हजार कोटी रुपये वाटलेत, हा मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे ही योजना राबवताना अर्जांची पडताळणी करणारे अधिकारी, कर्मचारी कोण होते? त्यांच्यावर कारवाई कधी करणार? निकषात बसत नसताना लाखो लाभार्थ्यांना महिनोनमहिने लाभ कसा दिला गेला? ही सरकारी तिजोरीची लूट नाही का? सरकारी निष्काळजीपणा, ढिसाळ नियोजन आणि राजकीय फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा आर्थिक बोजा महाराष्ट्राच्या जनतेने का उचलावा? या २४ हजार कोटींचा हिशोब महायुती सरकारला द्यावाच लागेल!”

लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा

महिलांकडून संताप व्यक्त

८१ लाख महिला अपात्र ठरल्याचे वृत्त समजताच महिला वर्गामध्ये याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. बँक खाती आणि आधार लिंक असूनही तांत्रिक त्रुटींमुळे नाव बाद झाल्याचा आरोप अनेक महिला करत आहेत. “निवडणुका संपल्यानंतर सरकारने नियमांचा जाच वाढवून हक्काचे पैसे नाकारले आहेत,” अशी भावना काही संतप्त महिलांनी ‘महिला चौपाल’मध्ये बोलताना व्यक्त केली. ऐन महागाईच्या काळात महिनाभराचा हातभार लावणाऱ्या या योजनेतून अचानक नाव वगळले गेल्याने महिला वर्गात मोठी चिंतेची आणि नाराजीची लाट आहे.

मोठी बातमी ! शेतकरी कर्जमाफीवर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार फायदा

Web Title: Varsha gaikwad accuses maharashtra government over disqualification of beneficiaries in ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Govenment
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

‘विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?’; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?’; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन
2

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?
3

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी
4

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.