Farmer Loan Waiver Scheme: राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार! दत्तात्रय भरणेंची घोषणा; सरकारवर ३६,५८५ कोटींचा भार
राज्यातही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेत राज्य सरकारने घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबतीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैंठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आगामी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी आणि शर्तीसंदर्भात परिपत्रक काढणार आहे.
राज्यात अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. शेतकरी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीसुद्धा शेतकरी कर्जमाफी कधी करणार या प्रश्नावरून सरकारला घेरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे महिन्यात याबाबत मोठे विधान करत ‘जून महिन्यात शेतकरी कर्जमाफी केली जाईल’ असे विधान केले होते. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही याबाबत संकेत दिले होते. आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅबिनेट मिटिंग घेण्यात आली. त्यात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून सहकार विभागाकडून अटी व शर्तीनंतर कर्जमाफी केली जाईल. मात्र राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकांमुळे लागलेल्या आचारसहिंतेमुळे या निर्णयाची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. या निर्णयानंतर दोन लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेवर आज कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीक कर्ज माफी देण्यात येईल. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाकडं रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकार कडून प्रोत्सहन देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान राज्य सरकार देणार आहे. म्हणजेच त्यांचे अतिकरिक्त ५० हजार रुपयांचे कर्ज माफ होईल.
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांमुळे आचारसंहिता चालू आहे. हि आचारसंहिता संपल्यावर राज्यात हि कर्जमाफी लागू केली जाणार आहे. कॅबिनेट बैठकीत या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली असली तरी अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. या निर्णयाद्वारे ६५ लाखांवर कर्जखात्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.






