Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप

मुंबईतील पहिल्याच पावसात उघड्या ड्रेनमध्ये महापालिकेचा कर्मचारी पडल्याच्या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयावर खासदार वर्षा गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देत महापौरांवर जोरदार निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Jun 26, 2026 | 03:48 PM
महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप

महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • महापौर रितू तावडे यांचे कर्मचारी ड्रेनमध्ये पडल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश
  • वर्षा गायकवाड यांची “पावसाचीही चौकशी करा” म्हणत महापौरांवर उपरोधिक टीका
  • उघडी गटारे आणि नागरिकांच्या सुरक्षेची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
 

मुंबईतील पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे गांधी मार्केट परिसरात पाहणीसाठी गेल्या असताना महापालिका कर्मचारी उघड्या ड्रेनमध्ये पडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठली.

या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी ही बाब संशयास्पद वाटत असल्याचे सांगत सखोल चौकशीचे आदेश दिले. कर्मचारी नेमका कशामुळे पडला, ड्रेन उघडा का होता आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

वर्षा गायकवाडांचा महापौरांवर उपरोधिक हल्ला

महापौरांच्या आदेशानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया दिली. “महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण आता त्याचीच चौकशी होणार आहे. मग पावसाचीही चौकशी करा,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

‘गँगस्टरही अशी भाषा बोलणार नाही, असं खासदार बोलतोय’; राज ठाकरे यांचा संजय दिना पाटलांवर निशाणा

त्या म्हणाल्या की, “मुंबईच्या महापौर तावडे यांनी आता पावसाची पण चौकशी लावावी! पहिल्या पावसात मुंबईत पाणी तुंबल्यावर महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला… पण आता त्याची चौकशी होणार आहे.. महापौर रितू तावडे पाहणी करताना महापालिकेचा कर्मचारी मुद्दाम गटारात पडला का? अशी चौकशी होणार आहे.. चौकशी करताना कर्मचाऱ्याला विचारा गटारात पडण्यापूर्वी परवानगी घेतली होती का? पडताना नियमांचे पालन केले का? गटाराची बदनामी करायची होती की पावसाची?”

मुंबईच्या महापौर तावडे यांनी आता पावसाची पण चौकशी लावावी! पहिल्या पावसात मुंबईत पाणी तुंबल्यावर महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला… पण आता त्याची चौकशी होणार आहे.. महापौर रितू तावडे पाहणी करताना महापालिकेचा कर्मचारी मुद्दाम गटारात पडला का? अशी चौकशी होणार आहे..
चौकशी करताना… pic.twitter.com/drDDU5ebQm
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 26, 2026

फक्त कर्मचाऱ्याची नाहीतर पावसाची पण चौकशी करा

“आमची तर मागणी आहे महापौर यांची बदनामी पावसाला करायची होती त्यामुळे पुढे जाऊन पावसाची चौकशी करा…पावसाची हिंमत झालीच कशी,तो पडला का? तो पडल्यामुळे मुंबईत पाणी तुंबले आणि त्यामुळे महापौर मॅडमना काम करावे लागले.. त्यामुळे महापालिकेने फक्त कर्मचाऱ्याची नाहीतर पावसाची पण चौकशी करावी!”

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा

सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

वर्षा गायकवाड यांनी महापालिका प्रशासनावर असंवेदनशीलतेचा आरोप करत, “पावसात कर्मचारी गटारात पडला, ही वेळ का आली? मुंबईत अजून कुठे गटार उघडी आहे का? सुरक्षा उपाय काय आहेत? याची चौकशी करण्याऐवजी कर्मचाऱ्याच्या हेतूवर संशय घेणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे! धन्य त्या महापौर, धन्य ते मुंबई महापालिका प्रशासन!” असे त्या यावेळी म्हणाल्या.

या प्रकरणामुळे मुंबईतील पावसाळी तयारी, नालेसफाई आणि उघड्या मॅनहोलच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Web Title: Varsha gaikwad slams mayor ritu tawde over bmc drain incident probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai Rain
  • Ritu Tawde
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
3

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.